एव्हरेस्टवीरांमुळे पुणं होतंय ‘माऊंटेनिंग हब’

By Admin | Published: May 29, 2015 01:03 AM2015-05-29T01:03:47+5:302015-05-29T01:03:47+5:30

अंग गोठवणारी थंडी.. बर्फाळ प्रदेश... आॅक्सिजनची कमी.. अशा परिस्थितीत फक्त समोर दिसणारा एव्हरेस्ट सर करायचा, या एकाच ध्येयाने पछाडलेल्या तरुण गिर्यारोहकांची संख्या वाढत आहे.

'Mountaineering Hub' for Everesters | एव्हरेस्टवीरांमुळे पुणं होतंय ‘माऊंटेनिंग हब’

एव्हरेस्टवीरांमुळे पुणं होतंय ‘माऊंटेनिंग हब’

googlenewsNext

प्रियांका लोंढे ल्ल पुणे
अंग गोठवणारी थंडी.. बर्फाळ प्रदेश... आॅक्सिजनची कमी.. अशा परिस्थितीत फक्त समोर दिसणारा एव्हरेस्ट सर करायचा, या एकाच ध्येयाने पछाडलेल्या तरुण गिर्यारोहकांची संख्या वाढत आहे. आजच्या नव्या पिढीला लाइफमध्ये थ्रिलिंग गोष्टी करायच्या असल्याने तरुणाई गिर्यारोहणाकडे आकर्षित होत आहे. या एव्हरेस्टवीरांमुळे आज पुण्याची ‘माऊंटेनिंग हब’ म्हणून नवी ओळख होताना दिसत आहे.
तरुणांमध्ये गिर्यारोहणाची ‘क्रेझ’ वाढत असतानाच, २९ मे हा ‘एव्हरेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो. ही माहिती बऱ्याच जणांना नाही. तेनसिंग नोर्गे आणि सर हिलरी या दोन तरुणांनी २९ मे १९५३ मध्ये एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवले आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या मानवाचा मान त्यांना मिळाला. आणि म्हणूनच २९ मे हा दिवस जगभरात ‘एव्हरेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो.
जगभरातून गिर्यारोहक हिमालयात ‘माऊंटेनिंग’साठी येतात. पूर्वी बऱ्याचशा सुविधा नसल्याने गिर्यारोहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. नेपाळ बॉर्डरपासून एव्हरेस्ट पायथ्यापर्यंतचा प्रवास त्यांना पायी करावा लागत असे. परंतु, आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. चांगल्या सुविधा आज गिर्यारोहकांना मिळत आहेत.

एव्हरेस्ट चढण्याकडे सर्वसामान्य माणूस एक आव्हान म्हणून पाहतो; परंतु आजच्या मुलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. गिर्यारोहणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतोय, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. मी १९९८मध्ये एव्हरेस्ट सर करून महाराष्ट्रातील पहिल्या एव्हरेस्टवीराचा मान मिळविला. त्या वेळी समजले की, तुम्ही जेव्हा एखादी मोहीम आखता व ती पूर्ण करता, त्या वेळचा आनंद हा वेगळाच असतो.- सुरेंद्र चव्हाण, गिर्यारोहक.

एव्हरेस्ट सर करणे शक्यच नाही, असे वैद्यकीय शास्त्रानुसार सांगितले होते; परंतु जिद्दीच्या बळावर माणूस आकाशाला गवसणी घालू शकतो, त्याचप्रमाणे त्याने एव्हरेस्टवर पाऊल ठेवून हिमालयच जिंकला आहे. तरुणांचा वाढता प्रतिसाद पाहता पुण्यातून अनेक नागरिक मोहिमेचे नेतृत्व गिरिप्रेमीतर्फे केले जात आहे. २०१२ मध्ये गिरिप्रेमीच्या ११ जणांनी एव्हरेस्ट चढून विक्रम केला आहे.- उमेश झिरपे, संघटक, गिरिप्रेमी संस्था

एव्हरेस्ट चढणे हा खरंच वेगळा अुभव होता. शेवटच्या टप्प्यात माझं सिलेक्शन झालं. वातावरणातील बदल, आजार या सर्व अडचणींना तोंड देत- १९ मे २०१२ रोजी सकाळी ८.३५ ला एव्हरेस्टवर पोचलो. २० ते २५ मिनिटे शिखरावर थांबून स्वप्न साकार झाल्याचा आनंद घेतला.- प्रसाद जोशी, एव्हरेस्टवीर

Web Title: 'Mountaineering Hub' for Everesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.