कोरोनात फेसबुक वरचा 'मूव्ह आऊट सेल 'ठरतोय पुणेकरांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 12:03 PM2021-06-07T12:03:32+5:302021-06-07T12:06:33+5:30

नोकरी गमावलेल्या,बाहेरगावी,इतर ठिकाणी राहायला जाणाऱ्या, गावी परतणाऱ्या नागरिकांसाठी साहित्य विकायची सोय

Move out cell | कोरोनात फेसबुक वरचा 'मूव्ह आऊट सेल 'ठरतोय पुणेकरांचा आधार

कोरोनात फेसबुक वरचा 'मूव्ह आऊट सेल 'ठरतोय पुणेकरांचा आधार

Next

कोरोना मुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली. तर वर्क फ्रॉम होम मुळे अनेकांनी आपल्या गावी परतणं देखील पसंत केलं. पण या सगळ्यामध्ये अडचण ठरत होती ती घरातल्या सामानाची.याच हेतूने सुरू झालेला मूव्ह आऊट पुणे सेल हा फेसबुक वरचा ग्रुप आज पुण्यात प्रसिद्ध झालाय. बाहेरगावी जायचं असो की घरचं रिनोवेशन अनेक जण या ग्रुप चा माध्यमातून आपल्या घरातलं समान विकणं पसंत करतायेत. 

पण या ग्रुप ची सुरुवात कशी झाली याविषयी या ग्रुप चा संस्थापक सदस्य श्वेता मोरे म्हणाल्या ," योगेश मुळे यांनी या ग्रुपची सुरुवात केली. त्यांच्या एका मित्राने एका खाजगी ॲप चा माध्यमातून सामान विकायचा प्रयत्न केला आणि त्याला २ हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले. त्यानंतर साधारण १० महिन्यांपूर्वी त्यांनी हा ग्रुप सुरू केला."

कोणताही मध्यस्त नसताना लोकांना मोफत आपल्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सामानाची जाहिरात करता यावी आणि खरेदी करणाऱ्या लोकांशी थेट संपर्क करता यावा ही या ग्रुप मागची संकल्पना. अगदी गेल्या १० महिन्यातच या ग्रुपचे ३५ हजार सदस्य झाले आहेत.

फ्रिज ,वॉशिंग मशीन ,फर्निचर पासून ते अगदी सायकल दुचाकी वाहने आणि अगदी पुस्तकं सुद्धा लोकांनी ग्रुप चा माध्यमातून विकली आहेत.काहींनी तर संपूर्ण संसारच विकून बाहेरगावी जाणं पसंत केलं. एखाद्या व्यक्ती किंवा पोस्ट विषयी संशय आला तर तो देखील सदस्य उघडपणे बोलून दाखवतात. यामुळे एकुण प्रक्रियेत फसवणूक टाळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यातच ग्राहक ते विक्रेता यांचा थेट संपर्क होत असल्यामुळे 

कोरोना ने अनेकांचे आयुष्य बदललं. या बदलाला सामोरे जात असताना समोर असलेल्या अनेक आव्हानांपैकी एक आव्हान कमी करायचा प्रयत्न पुणेकरांनी या ग्रुप च्या माध्यमातून केला आहे. 

Web Title: Move out cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.