मार्केट यार्डात ४०० टेम्पोसह आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:51+5:302020-12-31T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्ड परिसरात नियमित होणाऱ्या वाहतूककोंडीच्या विरोधात व आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवार (दि. ३०) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्ड परिसरात नियमित होणाऱ्या वाहतूककोंडीच्या विरोधात व आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवार (दि. ३०) रोजी सकाळी दहा वाजता टेम्पो पंचायत मार्केट यार्ड यांच्या वतीने पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यालयावर ३०० ते ४०० टेम्पोसह मोर्चा काढण्यात आला.
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव व संतोष नागरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन या प्रश्नांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
टेम्पो पंचायतचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी मोर्चा तात्पुरता स्थगित केल्याचे सांगितले. या वाहतूककोंडीचा तिढा सुटला नाही तर संपूर्ण बाजार बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चाच्या वेळी कामगार युनियन अध्यक्ष किसन काळे रोशन वनवे, अर्जुन दसाडे, साजन नांगरे, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट टेम्पो पंचायत गणेश जाधव, चंद्रकांत जावळकर, संजय सातपुते, सुरेश ठक्कर, हनुमंत निगडे, संजय दामोदरे, सोमनाथ शिंदे, राजकुमार शिंदे, गणेश दामोदर उपस्थित होते.
फोटो - टेम्पो पंचायत मार्केट यार्ड यांच्या वतीने पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यालयावर ३०० ते ४०० टेम्पोसह मोर्चा काढण्यात आला.