...तर जिल्हाभर आंदोलन; ऊसाला ३ हजार दरासाठी रयत क्रांतीचा इंदापुरात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 06:54 PM2017-12-08T18:54:19+5:302017-12-08T18:59:05+5:30

सरसकट तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसदर द्यावा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर यांनी आज (दि. ८) वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे बोलताना दिला.

...a movement across the district; indication by rayat kranti sanghatna in indapur | ...तर जिल्हाभर आंदोलन; ऊसाला ३ हजार दरासाठी रयत क्रांतीचा इंदापुरात रास्ता रोको

...तर जिल्हाभर आंदोलन; ऊसाला ३ हजार दरासाठी रयत क्रांतीचा इंदापुरात रास्ता रोको

googlenewsNext
ठळक मुद्देरयत क्रांती संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोकोतीन हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र : रयत क्रांती

इंदापूर : शासनाने एफआरपी वाढवल्यानंतर साखर कारखानदारांनी साखर उतारा चोरायला सुरुवात केली आहे. ऊस उत्पादकांसाठी नुकसानदायक असणारा हा प्रकार बंद करावा, सरसकट तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसदर द्यावा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर यांनी आज (दि. ८) वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे बोलताना दिला.
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला तीन हजार रुपयेप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात आंदोलने करण्याच्या रयत क्रांती संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक गावच्या हद्दीत रास्ता रोको आंदोलन केले. 
ते म्हणाले, की गाळपास आलेल्या ऊसाला तीन हजार रुपयेप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र शासनाने जशी जशी एफआरपीची रक्कम वाढवली. तशी तशी साखर कारखानदारांनी साखर उतारा चोरण्यास सुरुवात केली आहे. खरा साखर उतारा दडवला जात आहे. परिणामी एफआरपीची रक्कम कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी आज सरासरी २४०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला आहे. तो ऊस उत्पादक व रयत क्रांती संघटनेस मान्य नाही. तीन हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, होणाऱ्या दुष्परिणामांना साखर कारखानदार जबाबदार असतील, असे देवकर म्हणाले.
या वेळी रयत क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते भानुदास शिंदे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माऊली आहेर, जिल्हा संपर्कप्रमुख सर्फराज शेख, तालुकाध्यक्ष अभिमान शिंदे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष समाधान देवकर यांची भाषणे झाली.

Web Title: ...a movement across the district; indication by rayat kranti sanghatna in indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.