शहरातील तीन खासदार, तीन आमदार यांच्या घरासमोर आंदोलन

By admin | Published: June 7, 2017 08:38 PM2017-06-07T20:38:57+5:302017-06-07T20:38:57+5:30

शेतक-यांच्या प्रश्नाबाबत सुरू असणारे आंदोलन तीव्र झाले आहे. शहर परिसरातील विविध राजकीय पक्ष आणि संस्थांनी शेतक-यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शहरातील

Movement in front of three MPs, three MLAs in the city | शहरातील तीन खासदार, तीन आमदार यांच्या घरासमोर आंदोलन

शहरातील तीन खासदार, तीन आमदार यांच्या घरासमोर आंदोलन

Next

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 7- शेतक-यांच्या प्रश्नाबाबत सुरू असणारे आंदोलन तीव्र झाले आहे. शहर परिसरातील विविध राजकीय पक्ष आणि संस्थांनी शेतक-यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शहरातील तीन खासदार, तीन आमदार यांच्या घरासमोर आंदोलन केले. शेतकºयांबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे आवाज उठवा असे आवाहन केले. 

शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी ग्राह्य धराव्यात, शेतीमालाला हमी भाव मिळावा, या मागणीसाठभ एक जून पासून आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात शेतकºयांच्या मागणीस पाठींबा देण्यासाठी सत्तेत सहभागी असणारी शिवसेनाही उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष, स्वराज इंडिया पक्ष, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, स्वराज अभियान, शेतकरी कामगार पक्ष, माकप, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना आदी संघटना उतरल्या आहेत. या सर्वांनी आज सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरातील आमदार आणि खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले. ‘कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. 
आंदोलनात स्वराज अभियानाचे मानव कांबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहूल कलाटे, माजी नगरसेवक मारूती भापकर, राष्टÑवादीच्या सिंधू पांढरकर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माकपचे गणेश दराडे, मराठा सेवा संघाचे सदाशिव रानवडे, छावा संघटनेचे धनाजी येळकर, शेकापचे अक्षय जाधव, भालचंद्र फुगे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, राजेंद्र काळभोर, नुकुल भोईर आदी उपस्थित होते. सकाळी दहाला खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगाव येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर प्राधिकरणातील खासदार अमर साबळे यांच्या निवास स्थांनी, त्यानंतर पिंपरीतील आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या निवासस्थासमोर, त्यानंतर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थान, भोसरीतील आमदार महेश लांडगे यांचे लांडगेआळीतील निवासस्थान, आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच निवेदनही दिले.  तसेच लोकसभा आणि विधानसभा सभागृहातील विविध आयुधांचा वापर करून शेतकºयांना न्याय देण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. 
शेतकºयांच्या प्रश्नाबाबत शहरातील विविध संस्थांनी आमदार, खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यावेळी खासदार बारणे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास गेलेल्या आंदोलनकर्त्यांना बारणे यांनी निवेदन दिले. त्यात संसदेत उठविलेल्या लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरांची माहिती होती. याबाबत खासदार बारणे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील शेतकºयांची व्यथा आपण लोकसभेत मांडली आहे. शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, यासाठी आपण लोकसभेमध्ये सर्वाधिक वेळा प्रश्न उपस्थित करून शेतकºयांच्या भावना केंद्र सरकारपुढे मांडल्या आहेत. शेतकºयांच्या कर्जमुक्तीला  आपला जाहीर पाठिंबा आहे.  शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्त झालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी लोकसभेत शेतकºयांच्या प्रश्नांना अनेकदा वाचा फोडली आहे. सभागृहाबाहेर देखील शेतक-यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेने आंदोलन करून शेतकºयांना पाठिंबा दिला आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळायलाच हवी.’’

Web Title: Movement in front of three MPs, three MLAs in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.