जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ एफटीआयआयमध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:28 AM2020-01-06T00:28:41+5:302020-01-06T00:28:48+5:30

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये उमटले

Movement in FTII to protest the attack on JNU | जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ एफटीआयआयमध्ये आंदोलन

जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ एफटीआयआयमध्ये आंदोलन

Next

पुणे: जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये उमटले असून, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा संस्थेसमोर एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करत जेएनयूमधील विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर चांगलाच दणाणून गेला.

एफटीआयआयच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत विद्यार्थ्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे हातात मशाली पेटवून अभाविपचा निषेध केला. विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे समजताच काही पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. शहरात इतर ठिकाणी गेलेले विद्यार्थी सुध्दा हळूहळू आंदोलन स्थळी जमत असल्याचे दिसून आले. दरम्यान, जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात एनएसयूआयतर्फे निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असून, या निर्धार सभेत विविध विद्यार्थी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनएसयूआय संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे.
-----------
विद्यार्थ्यांवर अभाविपच्या गुंड कार्यकर्त्यांमार्फत भ्याड हल्ला झाला. देशाची सत्ता व गृहखातं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याच पक्षाची विद्यार्थी संघटना गुंडागर्दी करत देशाच्या प्रतीमेचे वाटोळे करत आहे, या फॅसिझमवाद्यांचा जाहीर निषेध, अशी प्रतिक्रिया एनएसयूआयचे राष्ट्रीय प्रतिनिधी अक्षय जैन यांनी केली.

Web Title: Movement in FTII to protest the attack on JNU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.