शनिपार चौकात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:12 AM2021-03-27T04:12:20+5:302021-03-27T04:12:20+5:30
काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीचा विरोध ; पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा पुढाकार पुणे : मोदी सरकारने ...
काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीचा विरोध ; पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा पुढाकार
पुणे : मोदी सरकारने संविधान व लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर काही गोष्टी लादल्या. त्यातील कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढीच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पाठिंबा देत आंदोलन केले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, महाविकास आघाडी आयोजित केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कृषी व कामगार कायद्यांच्या निषेधार्थ शनिपार चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे गोरख पळसकर, बबलू कोळी, गणेश शेडगे, मकरंद माणकीकर, संजय पासलकर, शिवसेनेचे ,चंदन साळुंके, नंदकुमार येवले, नितीन रवळेकर, राजेश मांढरे, भाग्यश्री जाधव, हर्षद ठकार, दिनेश दाभोळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण गवळे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे आदी उपस्थित होते.
देशभरातील शेतकरी व कामगार वर्ग आज आंदोलन करीत आहेत. त्यास पाठिंबा देण्यासाठी शनिपार चौकात पुणे शहर काँग्रेस कमिटीसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे पदाधिकारी एकत्र आले होते. त्यांनी काळ्या फिती लावत सरकारचा निषेध करीत शेतक-यांना पाठिंबा दिला आहे.