कात्रज कोंढवा रस्त्यावर मनसेचे हटके आंदोलन, खड्ड्यातल्या पाण्यात चालवली होडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:24 PM2019-07-03T17:24:07+5:302019-07-03T18:06:10+5:30

राजकीय श्रेयवादात अडकलेल्या ३ किलोमीटरच्या कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना यामध्ये लक्ष घालावे लागले...

movement by MNS for Katraj-Kondh road work | कात्रज कोंढवा रस्त्यावर मनसेचे हटके आंदोलन, खड्ड्यातल्या पाण्यात चालवली होडी

कात्रज कोंढवा रस्त्यावर मनसेचे हटके आंदोलन, खड्ड्यातल्या पाण्यात चालवली होडी

googlenewsNext
ठळक मुद्देसंथ गतीने काम चालू असल्याचा आरोप : जागा ताब्यात नसताना सुरु केले कामसुमारे ४० हुन अधिक बळी घेणा़ऱ्या ८४ मीटर डीपी रस्त्यासाठी अनेक राजकीय आंदोलने तीन महामार्गांना जोडणाऱ्या पालिकेचा पथदर्शी प्रकल्प म्हणुन या रस्त्याचे काम सुरु

कात्रज: मृत्यूचा सापळा म्हणुन कुपरिचित असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या संपूर्ण भूसंपादन न करता केलेले सुरु केलेले काम ३६ महिन्यांच्या मुदतीत संपेल की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. १५ मे रोजी लोकमतने याविषयी कात्रज -कोंढवा रस्त्याचे काम संथ गतीने या मथळ्या खाली सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती.त्याच प्रश्नावर आज मनसेच्या वतीने खोदण्यात आलेल्या खड्ड्यात होडी चालवून अनोखे आंदोलन करण्यात आले. ४० हुन अधिक बळी घेणा़ऱ्या ८४ मीटर डीपी रस्त्यासाठी २०१२ सालापासुन अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली.सुमारे ४ वेळा या रस्त्याची निविदा विविध कारणाने रद्द झाली.
राजकीय श्रेयवादात अडकलेल्या ३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना यामध्ये लक्ष घालावे लागले.तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता आता पुणे महानगरपालिकेचा पथदर्शी प्रकल्प म्हणुन या रस्त्याचे काम सुरु केले आहे. मात्र पालिका कर्मचारी जरी भूसंपादन झाले असल्याचे दावे करीत असले तरी चाललेल्या संथ गतीमुळे हे काम वेळेत पूर्ण होईल का यामध्ये शंका निर्माण होत आहे.

सुमारे १४९.५२ कोटी रुपयाचे हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे आहे.मात्र पहिल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९ ) मध्ये फक्त ३ कोटी रुपये या रस्त्यासाठी देण्यात आले.आता या आर्थिक वर्षात (२०१९-२०) मध्ये ३० कोटी रुपये या कामासाठी देण्यात आले आहेत. म्हणजे सुमारे दीड वर्षाच्या कामासाठी फक्त ३३ कोटी पालिकेने दिले आहेत.तीन वर्षाच्या या प्रकल्पाच्या फक्त सुमारे २२ टक्केच रक्कम देण्यात आली आहे.
      कात्रज - कोंढवा रस्त्याची पाहणी केली असता अजून पालिकेने २० टक्के देखील जागा ताब्यात घेतलेली दिसत नाही.मात्र, पालिका अधिकारी येथील ६२ टक्के जागा ताब्यात आल्याचा दावा करीत आहेत.असा आरोप मनसेचे गटनेते वसंत मोरे,व नगरसेवक साईनाथ बाबर यांनी यावेळी केला आजे.त्यांनी यावेळी सांगीतले फक्त कमिशन साठी ह प्रकल्प सुरु केला आहे.येथील अनेक नागरीकांची घरे व दुकाने देखील या रस्ता रुदिकरणात बाधीत होत आहेत मात्र त्यांचे पुनर्वसन अजून करण्यात आलेले नाही.फक्त शत्रुजय मंदीर व उन्नती धाम येथेच खड्डे खोदण्यात आले आहेत.पावसाने या खड्डयामध्ये पाणी साचले आहे,त्यामध्येच मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.यावेळी हडपसर मतदार संघातील मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी वसंत मोरे यांनी हे काम रखडण्यासाठी स्थानिक आमदार व प्रभाग क्रमांक ३८ व ४१ चे नगरसेवक जबाबदार असल्याचे सांगितले.व पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला.

Web Title: movement by MNS for Katraj-Kondh road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.