भीमाशंकर कारखान्याकडून शेतकऱ्यांची धूळफेक, कारखानास्थळावर शिवसेनेकडून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 12:36 AM2018-11-07T00:36:19+5:302018-11-07T00:37:35+5:30
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतक-यांच्या डोळ्यात ऊस बाजारभाव देण्याबाबत धूळफेक केली आहे. एफआरपीनुसार ४६८ रुपये अंतिम बाजारभाव येत्या १५ दिवसांत द्यावा, अन्यथा साखर कारखान्यासमोर उपोषण करून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अरुण गिरे यांनी मंगळवारी दिला.
अवसरी - भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतक-यांच्या डोळ्यात ऊस बाजारभाव देण्याबाबत धूळफेक केली आहे. एफआरपीनुसार ४६८ रुपये अंतिम बाजारभाव येत्या १५ दिवसांत द्यावा, अन्यथा साखर कारखान्यासमोर उपोषण करून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अरुण गिरे यांनी मंगळवारी दिला.
शिवसेनेच्या वतीने भीमाशंकर कारखान्याच्या गेटसमोर बाजारभाव देण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा समन्वयक अरुण गिरे बोलत होते. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव ढोबळे, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनिल बाणखेले, शिवसेना नेत्या जयश्री पलांडे, अनिल काशिद, सचिन बांगर, रविंद्र वळसे पाटील, कल्याण हिंगे, अजित चव्हाण, दिपक घोलप, प्रविण थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा समन्वयक अरुण गिरे म्हणाले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांची फसवणुक केली आहे .आकड्यांचा खेळ करुन बाजारभाव देण्याबाबत गल्लत केली आहे. संपुर्ण राज्यात यंदाच्या वर्षी भीषण दुष्काळजन्य परिसिथती निर्माण झाली असुन आंबेगाव-शिरुर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन दिवाळी सणात केवळ १०० रुपयांचा हफ्ता जाहीर करुन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सातत्याने काबाड कष्टाने ऊस घालुन नावारुपास आणलेला कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतक-यांची क्रुर चेष्ठा चालवली आहे , असा आरोप गिरे यांनी केला. यावेळी शिवाजीराव ढोबळे, जयश्री पलांडे, रविंद्र करंजखेले यांची भाषणे झाली.शिवसेना नेत्यांचे निवेदन भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी स्विकारले.
प्रतिटन ३५०० हमीभावाची मागणी
दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे चालु वर्षी शेतकºयांच्या ऊसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा.सतत ३ वर्षे ऊस घालणाºया ऊस उत्पादक शेतक-यांना तात्काळ कारखान्याचे सभासद करावे. मयत सभासदांच्या वारसदारांची वारसनोंद करावी.भीमाशंकर कारखान्याच्या कर्मचा-यांचा खाजगी साखर कारखान्यांसाठी होणारा वापर बंद करावा.कारखान्याला ऊस पुरवठा करणाºया ऊस पुरवठादार शेतक-यांच्या दुष्काळग्रस्त गावांसाठी पाच टँकर व ५ हजार लीटर क्षमतेच्या पाचशे पाणी टाक्या पुरवाव्यात. शेतकºयांच्या ऊसाचे पैसे त्यांच्या खात्यात १५ दिवसात जमा करावे इत्यादी मागण्या केल्या आहेत.
आंदोलन चुकीचे : आ. वळसे पाटील
अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर ऊस बाजारभावासंदर्भात राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिवसेनेने केलेले आंदोलन चुकीचे आहे. ऊस उत्पादक शेतकºयांचा भीमाशंकर कारखान्यावर पूर्णपणे विश्वास असून बाजारभाव देण्याबाबत कारखाना कटिबद्ध आहे. भीमाशंकरने अंतिम दर असल्याचे म्हटले नसताना शिवसेनेने केवळ राजकीय स्टंट म्हणून शेतक-यांची दिशाभूल करून गैरसमजापोटी आंदोलन केले आहे, अशी टीका कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.मंचर येथील पूजन प्रेस्टिज येथे भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवार दि.६ रोजी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंंडे ,संचालक दादाभाऊ पोखरकर उपस्थित होते .सध्या शिवसेनेकडे लोकांसमोर जाण्यासाठी कोणतेही माध्यम नसल्याने त्यांनी चांगल्या चाललेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला टार्गेट केले आहे. असे सांगुन वळसे पाटील म्हणाले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर ऊस उत्पादकांचा शिवसेना सोडुन भरवसा आहे.
केवळ आम्हाला शेतक-यांचा कळवळा आहे. असे भासवण्याचा काही शिवसेना नेत्यांचा प्रयत्न आहे. परंतु ऊस उत्पादक शेतक-यांना भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालु असल्याचा विश्वास आहे. चांगल्या चाललेल्या भीमाशंकर कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.