मातंग आरक्षणासाठी राज्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:31+5:302021-01-15T04:09:31+5:30
पुणे : मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न, अण्णा भाऊ साठे स्मारक, लहूजी वस्ताद साळवे यांचे ...
पुणे : मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न, अण्णा भाऊ साठे स्मारक, लहूजी वस्ताद साळवे यांचे स्मारक अशा विविध मागण्यांसाठी २१ जानेवारीला सकाळी ११ वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिन्द्र सकटे यांनी गुरुवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली ही माहिती दिली. यावेळी पुष्पलता सकटे, लक्ष्मी पवार, जयवंत जाधव, विकास भोंडवे, खंडूजी पवार आदी उपस्थित होते.
सकटे म्हणाले की, राज्यातले आघाडी सरकार मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणावर विशेष भूमिका घेताना दिसत आहे. परंतु मातंग समाजाच्या आरक्षण आणि अन्य मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. आघाडी सरकार मराठ्यांसाठी काम करणारे मराठा सरकार वाटू लागले आहे. मातंग समाजाच्या कोणत्याही प्रश्नांवर हे सरकार गंभीर नाही. आघाडी सरकारला इशारा देण्याच्या उद्देशाने लक्षवेधी राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करीत आहोत.