दलितवस्ती निधीचा वापर इतरत्र केल्यास आंदोलन - बाळासाहेब चांदेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:20 AM2019-03-04T01:20:46+5:302019-03-04T01:20:53+5:30
मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दलितवस्ती अंतर्गत येणाऱ्या कामांचा निधी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे इतर ठिकाणी खर्च करू नये, तसे केल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन केले जाईल
पौड : मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दलितवस्ती अंतर्गत येणाऱ्या कामांचा निधी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे इतर ठिकाणी खर्च करू नये, तसे केल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा मुळशी पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी दिला. सूस ग्रामपंचायतीच्या वतीने ६२ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणा-या बुद्धविहार समाजमंदिराचा भूमिपूजन समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. बी. एन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक निकाळजे होते.
ग्रामपंचायतीच्या वतीने समाजकल्याण अंतर्गत येणा-या रकमेमधून वरील काम हाती घेण्यात आले असल्याचे सूसचे सरपंच अपूर्वा निकाळजे यांनी सांगितले. गोरगरीब जनतेवर होण्या-या अन्यायासाठी आम्ही काम करत असून सूस ग्रामस्थांसाठी भरीव मदत करणार असल्याचे दीपक निकाळजे यांनी सांगितले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य विजय केदारी, मा. नगरसेवक शेखर ओव्हाळ यांची भाषणे झाली.
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख विशाल पवार, रा.स.पा.तालुका अध्यक्ष अतुल सुतार, महिला तालुका संघटिका ज्योती चांदेरे, सूसगावच्या सरपंच अपूर्वा निकाळजे,
उपसरपंच गजानन चांदेरे, मा. उपसरपंच सचिन चांदेरे,
शुभांगी ससार, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चांदेरे, गणेश साळुंके,
बाळू निकाळजे, ग्रामपंचायत सदस्या दीपाली पारखी, दिशा ससार,
सीमा निकाळजे, मा.सरपंच नारायण चांदेरे,मीरा देवकर, मा.उपसरपंच
मीना चांदेरे, मा. चेअरमन दत्तोबा चांदेरे,नवनाथ चांदेरे, तंटामुक्ती
अध्यक्ष रोहिदास चांदेरे, बाळासाहेब भोते,सतीश चांदेरे, शाखाप्रमुख वाल्मीक चांदेरे, महिला आघाडी शाखाप्रमुख शांताबाई चांदेरे, सोमनाथ कोळेकर, अमित निकाळजे, शंकर चांदेरे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अपूर्वा निकाळजे यांनी केले.सूत्रसंचालन अॅड.तायडे यांनी केले.