सुप्यात कोविड सेंटर करण्याबाबत हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:37+5:302021-05-05T04:17:37+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपे येथे कोविड सेंटर करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी ...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपे येथे कोविड सेंटर करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सुपे ग्रामीण रुग्णालयाची नूतन व जुनी इमारत, जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या सौर अभ्यासिकेची इमारत आणि शहाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत आदी ठिकाणची पाहणी केली.
याप्रसंगी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी सभापती नीता बारवकर, उपसभापती रोहित कोकरे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, बाजार समितीचे माजी सभापती शौकत कोतवाल आदी उपस्थित होते. यावेळी येथे मिळणाऱ्या विविध सुविधांचीही माहिती घेण्यात आली.
यावेळी सुपे ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर व शहाजी विद्यालयात ५० बेडचे विलगिकरण कक्ष उभारणीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. त्यादृष्टीने ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पाईप बसवण्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात येणार आहे. तसेच पुढील आठवड्यात येथील कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतलल्याची माहिती डॉ. मनोज खोमणे, संभाजी होळकर यांनी दिली.
-
सुपे येथे कोविड केअर सेंटरसाठीच्या जागेची पाहणी करताना अधिकारी व पदाधिकारी.