Sanjay Raut: 'भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भोंग्यांचा त्रास झाला'; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 09:49 PM2022-05-05T21:49:27+5:302022-05-05T21:50:01+5:30
खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीका केली आहे.
पुणे- मनसेप्रमुख राज ठाकरे हे चांगले व्यंगचित्रकार होते. मात्र भाजपाने त्यांच्या व्यंगचित्राचा गळा घोटला. अनेक व्यंगचित्रकारांना हल्ली लाईनही वाचता येत नाही, तर काही व्यंगचित्रकार आपली लाईन बदलतात, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते.
गेली १५ वर्षे ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला, हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे, अशी टीका देखील संजय राऊतांनीराज ठाकरेंवर केली आहे. शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपाकडून सुपाऱ्या दिल्या जात असून त्या स्वीकारल्याही जात असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
शिर्डी, पंढरपूर याठिकाणी लोकांना आज काकड आरती घेता नाही आली. हजारो भाविक याला मुकले. यांच्यामुळे हिंदूंचा गळा आवळला गेला, असं विधानही संजय राऊत यांनी यावेळी केले. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केल्याशिवय दिवस उजाडत नाही. त्यांनी महाराष्ट्र घडवला, शिवसेना उभी केली, स्वाभिमान दिला. बाळासाहेबांच्या जवळून 30 वर्ष काम करणारा मी आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मॅडम स्वत: संजय राऊतांचे फोन ऐकायच्या; 'त्या' जबाबानं रश्मी शुक्लांचा पाय खोलात https://t.co/iTKR0LOksq
— Lokmat (@lokmat) May 5, 2022