कोव्हॅक्सिनच्या मान्यतेसाठी खासदार बापट यांचे केंद्राला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:56+5:302021-05-27T04:11:56+5:30

पुणे : कोव्हॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती ...

MP Bapat to the Center for approval of Kovacin | कोव्हॅक्सिनच्या मान्यतेसाठी खासदार बापट यांचे केंद्राला साकडे

कोव्हॅक्सिनच्या मान्यतेसाठी खासदार बापट यांचे केंद्राला साकडे

Next

पुणे : कोव्हॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना केली आहे़

याबाबतचे पत्र बापट यांनी डॉ. हर्षवर्धन यांना पाठविले असून, या पत्रात त्यांनी भारत बायोटेक यांनी निर्माण केलेली कोव्हॅक्सिन घेतलेल्या प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येत नाही.

अनेक देश पूर्णपणे लसीकरण केलेल्या परदेशी प्रवाशांना सध्या परवानगी देऊन पर्यटनाला चालना देत आहेत. तथापि कोव्हॅक्सिनला मान्यता नसल्याने भारतातील प्रवासी पर्यटनापासून वंचित राहत आहेत. अन्य कारणांसाठी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांनाही अडचणी येत आहेत. त्यामुळे भारत बायोटेकच्या प्रस्तावात लक्ष घालून, कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे बापट यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: MP Bapat to the Center for approval of Kovacin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.