मानधनाचे पैसे देऊन खासदार बापट यांच्याकडून सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:02+5:302021-05-20T04:11:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: खासदार म्हणून मिळणारे मानधन व आणखी काही निधी जमा करून खासदार गिरीश बापट यांनी शहरातील ...

MP Bapat protests the government by paying honorarium | मानधनाचे पैसे देऊन खासदार बापट यांच्याकडून सरकारचा निषेध

मानधनाचे पैसे देऊन खासदार बापट यांच्याकडून सरकारचा निषेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: खासदार म्हणून मिळणारे मानधन व आणखी काही निधी जमा करून खासदार गिरीश बापट यांनी शहरातील सुमारे ३०० रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपये मदत दिली. कोरोना निर्बंधातील मदत सरकार देत नसल्याचा हा निषेध असून त्याविरोधात गुरुवारी सकाळी आरटीओ कार्यालयात आंदोलन करणार असल्याचे बापट यांनी जाहीर केले.

शहरातील विविध रिक्षा संघटनांना त्यांच्यातील गरजू २५ चालकांना मदत म्हणून एकत्रित रकमेचा धनादेश बापट यांनी दिला. रिक्षा पंचायत, आप रिक्षा तसेच अन्य काही संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सरकारने मदत जाहीर केली त्याला महिना झाला. अजून एकाही चालकाला ५ पैसेही मिळालेले नाहीत. पालकमंत्री अजित पवार यांच्यापासून सर्व ठिकाणी दाद मागितली, पण दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही व तेच करणार आहे, असे बापट यांंनी सांगितले. माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, नगरसेवक उमेश गायकवाड, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बापू मानकर, प्रचार प्रमुख पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

पुणे शहर ऑटोरिक्षा फेडरेशन, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, विद्यार्थी वाहतूक संघटना, सावकाश रिक्षा संघ, मनाली ऑटो रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, राष्ट्रवादी रिक्षा संघटना, पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना, क्रांतिवीर रिक्षा संघटना, सत्यसेवा वाहतूक संघ पुणे, आम आदमी रिक्षा चालक संघटना, एआयएमआयएम पुणे रिक्षा संघटना, भाजप वाहतूक आघाडी, पीएस अमर ऑटो रिक्षा संघटना, फडके हौद रिक्षा संघटना, रिक्षा परिषद, भारतीय दलित कोब्रा रिक्षा संघटना, रिक्षा ब्रिगेड, महाराष्ट्र रिक्षा सेना या संघटनांच्या प्रतिनिधींजवळ त्यांच्या २५ सदस्यांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला.

Web Title: MP Bapat protests the government by paying honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.