एमपीए ‘अ’ उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: April 25, 2017 04:23 AM2017-04-25T04:23:52+5:302017-04-25T04:23:52+5:30

पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित इंदिरा जोशी स्मृती १८ वर्षांखालील जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील

MPA 'A' quarterfinal | एमपीए ‘अ’ उपांत्यपूर्व फेरीत

एमपीए ‘अ’ उपांत्यपूर्व फेरीत

Next

पुणे : पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित इंदिरा जोशी स्मृती १८ वर्षांखालील जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील संघाचे आव्हान एक्स्ट्रा टाइममध्ये ५०-४८ने संपवून थरारक विजयासाह एमपीए ‘अ’ने सोमवारी मुलांच्या गटातून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
कोथरूड येथील मिलेनियम नॅशनल स्कूलच्या बास्केटबॉल कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. मुलांच्या गटात आज झालेल्या झालेली उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांपैकी एमपीए ‘अ’ आणि डी. वाय. पाटील संघांतील लढत लक्षवेधी ठरली. हाफ टाइममध्ये २०-११ने आघाडीवर असलेल्या एमपीए ‘अ’ला नंतर मात्र डी. वाय. पाटील संघाच्या खेळाडूंनी जबरदस्त झुंज दिली. यामुळे सामना संपला तेव्हा स्कोअर ३८-३८ असा बरोबरीत होता. निकालाची कोंडी फोडण्यासाठी एक्स्ट्रा टाइमचा वापर करण्यात आला. यात एमपीए ‘अ’च्या खेळाडंूनी बाजी मारत संघाला ५०-४८ असा अवघ्या २ गुणांनी रोमांचक विजय मिळवून दिला. साहिल पटेल (१७) आणि अथर्व ताम्हाणे (१५) एमपीए ‘अ’च्या विजयाचे शिल्पकार ठरले. डी. वाय. पाटील संघातर्फे राहुल गुजर (२१), शेखर उपाध्ये (१२) यांनी दिलेली झुंज थोडक्यात अपयशी ठरली.
अक्षय भोसले जिमखाना (एबीजी) संघाने पीवायसीचे आव्हान ५५-४७ने संपवून अंतिम आठ संघांमध्ये प्रवेश केला. विजयी संघातर्फे ओंकार गद्रे आणि जोगिंदर संधू यांनी प्रत्येकी १५ गुण नोंदविले. पीवायसीकडून आरिक गरवारे (२०) आणि अर्जुन कोचर (१०) यांनी चमकदार खेळ केला. मात्र, त्यांना इतर खेळाडूंकडून साथ लाभली नाही.
पंकज चौधरी (१७) आणि दर्शन दाभाडेच्या (११) खेळामुळे चुरशीच्या लढतीत विद्यांचल ‘अ’ने एमएएसए संघावर ५७-५५ अशी निसटत्या फरकाने सरशी साधली. सीएनएसएने गुरुनानक पब्लिक स्कूलवर ५४-३१असे सहजपणे सरशी साधली. स्काय लाऊंज ‘अ’ने एसएपीचा २८-७ने धुव्वा उडविला.
हाय स्कोअरिंग लढतीत डेक्कन जिमखाना ‘अ’ संघाने आयडिलचा ६९-४९ असा पराभव केला. ३७ गुण नोंदविणारा नागेश सुतार विजयाचा शिल्पकार ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: MPA 'A' quarterfinal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.