येरवडा परिसरात हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या महिला गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

By नितीश गोवंडे | Published: January 13, 2024 04:48 PM2024-01-13T16:48:56+5:302024-01-13T16:49:25+5:30

पोलिस आयुक्तांची ही ८३ वी कारवाई केली आहे....

MPDA action against women criminals selling Hatbhatti liquor in Yerawada area | येरवडा परिसरात हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या महिला गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

येरवडा परिसरात हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या महिला गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

पुणे :येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे करणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली. पोलिस आयुक्तांची ही ८३ वी कारवाई केली आहे.

विमल विजय राठोड (४३, रा. बंजारा मित्र मंडळाजवळ, नाईकनगर, येरवडा) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या अभिलेखावरील सराईत महिला गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपी विमल राठोड आणि तिच्या साथीदारांनी येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भेसळयुक्त गावठी हातभट्टी दारूची विक्री करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षात तिच्याविरोधात ११ गुन्हे दाखल आहेत. तिच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास व जिवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच तिच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपीविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्तांनी आरोपी विमल राठोड हिला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

ही कामगिरी येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखा, पीसीबी चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या पथकाने केली. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल ८३ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली असून, आगामी काळात देखील सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: MPDA action against women criminals selling Hatbhatti liquor in Yerawada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.