MPSC Result: एमपीएससीकडून वन विभागाचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 10:51 AM2021-09-30T10:51:02+5:302021-09-30T10:51:34+5:30
या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील वैभव दिघे हा राज्यातून तसेच मागासवर्गीय संवर्गातून प्रथम आला आहे.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महसूल व वन विभागातील सहायक वन संरक्षक, गट-अ तसेच वन क्षेत्रपाल, गट- ब या संवर्गातील एकूण 100 पदांवरील भरतीकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील वैभव दिघे हा राज्यातून तसेच मागासवर्गीय संवर्गातून प्रथम आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील पूजा पानसरे या महिलांमधून प्रथम आल्या आहेत.
TET Exam: 'टीईटी’ परीक्षेच्या ताखेत पुन्हा बदल
वन क्षेत्रपाल पदाकरिता खेळाडूंसाठी आरक्षित 4 पदांचा तसेच अन्य 3 पदांचा निकाल प्रशासकीय कारणास्तव तसेच अन्य एका उमेदवाराचा निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वन विभागाच्या पदांची गुणवत्ता यादी, गुणांची वर्गवारीनिहाय सीमरेषा यथावकाश प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.