MPSC | शेवटची मुलाखत संपताच एमपीएससीकडून तासाच्या आत निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 08:38 PM2022-03-24T20:38:41+5:302022-03-24T20:47:38+5:30

आयोगाच्या या वेगवान कामाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा

mpsc announces results within an hour after the last interview | MPSC | शेवटची मुलाखत संपताच एमपीएससीकडून तासाच्या आत निकाल जाहीर

MPSC | शेवटची मुलाखत संपताच एमपीएससीकडून तासाच्या आत निकाल जाहीर

Next

पुणे: आज एमपीएससीद्वारे (Maharashtra Public Service Commission) घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2020 परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये दिनांक 14 मार्च ते 24 मार्च 2022 या काळात मुलाखती घेण्यात आल्या होत्या. विशेष बाब म्हणजे हा निकाल शेवटच्या विद्यार्थ्याच्या मुलाखतीनंतर एका तासाच्या आत लावण्यात आला. 7 वाजता मुलाखती संपल्यानंतर आयोगाकडून लगेच ८ वाजेपर्यंत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. आयोगाच्या या वेगवान कामाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 

सदर भरतीप्रकियेकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादी व पुढील प्रक्रियेकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  प्रस्तुत भरतीप्रक्रियेतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता बाहेर पडण्यासाठीची (Opting Out) वेबलिंक दिनांक 25 मार्च ते 31 मार्च 2022 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

14 मार्च ते 24 मार्च 2022 दरम्यान 73 पदासांठी 227 विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती समाप्त झाल्यानंतर एका तासाच्या कालावधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.

काय आहे परिपत्रकात-

1. सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जांमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे यांची पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी मा. न्यायालयात दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.

2. प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रीयेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या http://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Post Preference / Opting Out' वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक २५ मार्च, २०२२ रोजी १५.०० वाजेपासून दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

3. ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब/निवेदने/ पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतला जाणार नाहीत.

4. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल/शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.

5. भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

Web Title: mpsc announces results within an hour after the last interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.