MPSC| एमपीएससीेने जाहीर केला सुधारित अभ्यासक्रम; राज्यसेवा मुख्य परीक्षा असणार वर्णनात्मक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 06:19 PM2022-07-21T18:19:24+5:302022-07-21T18:28:59+5:30
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर....
पुणे : एमपीएससीेने काही दिवसांपूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक होईल अशी घोषणा करून त्याचे प्रसिद्धपत्रक काढले होते. आता आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबतचा निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केला आहे. सदर प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा इंग्रजी भाषेतील सविस्तर अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला होता. राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक म्हणजेच लेखी करण्याचा महत्त्वाचा निर्णय आयोगाने घेतला होता. ही परीक्षा योजना 2023 मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असेल. तसेच त्यापूर्वी राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (CSAT) अर्हताकारी केला होता. सदर निर्णयाची अंमलबजावणी दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून करण्यात येत आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू असेल.
राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/LQu3gV3k94https://t.co/Zq9oANzyewpic.twitter.com/dCVadjPdyJ
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 21, 2022
आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील नवीन अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सुधारित परीक्षायोजना व अभ्यासक्रमामुळे अधिकाअधिक गुणवत्ताधारक उमेदवार उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे.
-सुनिल अवताडे (सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)