MPSC | एमपीएससी परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू; परीक्षार्थींनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 03:51 PM2023-02-24T15:51:53+5:302023-02-24T15:53:51+5:30
नवीन बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतली भेट...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ लागू करण्याची मागणी होती. यावर अखरे राज्यसेवा आयोगाने काल (गुरुवार, २३ फेब्रुवारी) परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ पासून लागू होणार आहे. नवीन बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कसबा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारार्थ शिंदे यांना रोड शो आयोजित करण्यात आला होता.
एमपीएससी परीक्षार्थी उमेदवारांनी आज पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवसेना कार्यालय येथे भेट घेऊन शासनाने घेतलेल्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी मानलेल्या आभाराचा विनम्रपणे स्वीकार करून सरकार कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. हे आंदोलन राज्यसेवा मुख्य वर्णनात्मक न घेता एमसीक्यू पद्धतीने घ्यावी अशी मागणी होती. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी पुण्यात जे एम रस्त्यावर बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन करत होते. आता परीक्षा पद्धतीमधील बदल २०२५ पासून लागू होणार आहे.
एमपीएससी परीक्षार्थी उमेदवारांनी आज पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या #शिवसेना कार्यालय येथे भेट घेऊन शासनाने घेतलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांनी मानलेल्या आभाराचा विनम्रपणे स्वीकार करून सरकार कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे नमूद केले. #MPSCpic.twitter.com/PDVApN9OjW
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 23, 2023
परीक्षेतील बदल २०२३ पासून लागू न होता ते २०२५ या वर्षापासून लागू होणार आहेत. याबद्दलचे नोटिफिकेशन आयोगाने काढले आहे. या नोटिसमध्ये म्हटले आहे की, परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.