MPSC Exam: संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आयोगाची नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:35 AM2022-02-25T10:35:40+5:302022-02-25T10:36:48+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियमावली जाहीर केली आहे...
पुणे : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठी उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (mpsc) नियमावली जाहीर केली आहे. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणावे, परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य आहे.
परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश नाही. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र, तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करावी लागणार आहे.
परीक्षा कक्षात मोबाईल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही. परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही.