MPSC | परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी! एमपीएससीने संधीची मर्यादा केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 10:55 AM2022-06-16T10:55:13+5:302022-06-16T10:56:02+5:30
वयोमर्यादेच्या अधीन राहूनच विद्यार्थ्यांना मिळणार संधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दिव्यांग, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक तसेच अमागास उमेदवारांसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द केली आहे. संधीची मर्यादा घातल्यामुळे विद्यार्थिवर्गात संभ्रम होता. तो दूर झाला आहे. यापुढील सर्वच परीक्षांमध्ये ज्या-त्या प्रवर्गातील वयोमर्यादेच्या अधीन राहूनच विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. pic.twitter.com/C7I315Xzbo
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 15, 2022
परिणामी आयोगाने संधीची मर्यादा रद्द केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळणार आहे. या निर्णयाचे स्पर्धा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. आयोगाने काही महिन्यांपूर्वी कमला संधीचा निर्णय घेतला होता. तो आता पुन्हा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.