"मुख्यमंत्री महोदय, हे धक्कादायक, चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे आहे...!"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 04:17 PM2021-09-04T16:17:35+5:302021-09-04T20:01:30+5:30

पूर्व हवेलीतील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कदमवाकवस्ती सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

"Mr. Chief Minister, this is shocking, annoying and ...!" : Chitra wagh statement | "मुख्यमंत्री महोदय, हे धक्कादायक, चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे आहे...!"

"मुख्यमंत्री महोदय, हे धक्कादायक, चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे आहे...!"

Next

पुणे (कदमवाकवस्ती) :  पूर्व हवेलीतील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कदमवाकवस्ती सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया देताना ट्विटरद्वारे राष्ट्रवादी काँग्रेवर सडकून टीका केली आहे. 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भातला एक व्हीडिओच स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. वाघ यांनी ट्विट करत हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहेअसल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

पुण्याजवळील कदमवाकवस्ती येथे लसीकरणाच्या श्रेयवादावरून शुक्रवारी ( दि. ४) सरपंच गौरी गायकवाड गटाची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली. तसेच यात सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. याबाबत वाघ यांनी गायकवाड यांना यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

https://twitter.com/ChitraKWagh/status/1433789847492202497?s=20

याच प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. गृहखाते ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ करणे त्यांना अ‍ॅट्रॉसिटीच्या धमक्या देणे, महिला सरपंचाला मारहाण करणे याचे लायसन्स दिले आहे का? मुख्यमंत्री महोदय हे धक्कादायक, चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे आहे."असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

Web Title: "Mr. Chief Minister, this is shocking, annoying and ...!" : Chitra wagh statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.