श्री काशिविश्वेश्वर तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:06+5:302021-08-12T04:14:06+5:30
बारामती : श्रीकाशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. ...
बारामती : श्रीकाशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट, माणिकाबाई चंदूलाल सराफ ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने ब्लड बँकेतून रक्तपुरवठा करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर ब्लड बँकेच्या विनंतीवरून श्रीकाशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून ब्लड बँकेच्या गरजेनुसार तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
ब्लड बँकेच्या विनंतीवरून गटनेते सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सूरज सातव यांनी श्रीकाशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बारामती आणि परिसरात अनेक रक्तदान शिबिरे होतात. ती शिबिरे पुणे, सोलापूर, बार्शी येथील रक्तपेढ्या बारामतीत येऊन आमिष दाखवून रक्त संकलन करून जातात, त्याचा प्रत्यक्ष परिणाम स्थानिक रक्तपुरवठ्याला होतो. ज्याचा स्थानिक गरजू रुग्णाला उपयोग होत नाही. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजकांनी स्थानिक रक्तपेढीतच रक्तदान शिबिर आयोजित करावे, असे आवाहन ब्लड बँकेचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी केले आहे.