कोंढव्यात महावितरणच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:56 PM2017-10-03T14:56:00+5:302017-10-03T15:04:09+5:30

कोंढवा-मिठानगर प्रभाग क्रमांक २७ या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून अघोषित लोडशेडींग होत आहे. त्याच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

The MSEB office was sabotage by mns | कोंढव्यात महावितरणच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

कोंढव्यात महावितरणच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

Next
ठळक मुद्देमहावितरणला मनसेच्या वतीने अनेकदा निवेदन देण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करीत निषेध व्यक्त केला.

पुणे : सतत होणार्‍या भारनियमनाच्या निषेधार्थ मंगळवारी कोंढव्यातील महावितरणच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. 
कोंढवा-मिठानगर प्रभाग क्रमांक २७ या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून अघोषित लोडशेडींग होत आहे. याबाबत सूचना दिली जात नसल्याने त्यामुळे प्रभागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे . याबाबत महावितरणला मनसेच्या वतीने अनेकदा निवेदन देण्यात आली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही. नागरिकांचे फोन न उचलणे, उचलला तर येतो १५ मिनिटात असे सांगून २ तास नागरिकांना वेठीस धरणे, नवीन लाईट मीटर घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना जादा  पैसे न दिलेल्यांना कागदपत्रांतील त्रुटी काढून चकरा मारावयास लावणे, लाईट बील वेळेवर येत नाही, अशा तक्रारी करण्यात येत होत्या, असे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी सांगितले. 


आज दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करीत निषेध व्यक्त केला. कार्यालयाची तोडफोड केली. काचा फोडल्या, खुर्च्यांची मोडतोड केली. चार दिवसांत मागण्या मान्य करण्यात येतील, असे पत्र मनसे कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांकडून घेतले. 

Web Title: The MSEB office was sabotage by mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.