एका क्लिकवर मिळणार महावितरणचे अ‍ॅप

By admin | Published: May 24, 2017 03:55 AM2017-05-24T03:55:34+5:302017-05-24T03:55:34+5:30

दर महिन्याला येणारे महावितरणचे वीजबिल नव्या रंगात आणि सुटसुटीत माहितीसह ग्राहकांना मिळू लागले आहे. या वीजबिलावरील ‘क्यूआर’ कोडच्या साह्याने

MSEDCL app will get one click | एका क्लिकवर मिळणार महावितरणचे अ‍ॅप

एका क्लिकवर मिळणार महावितरणचे अ‍ॅप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : दर महिन्याला येणारे महावितरणचे वीजबिल नव्या रंगात आणि सुटसुटीत माहितीसह ग्राहकांना मिळू लागले आहे. या वीजबिलावरील ‘क्यूआर’ कोडच्या साह्याने अवघ्या एका क्लिकवरून महावितरणचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. अ‍ॅन्ड्रॉईड, विन्डोज आणि आयओएस आॅपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईल ग्राहकांना क्यूआर कोडच्याइमाध्यमातून हे अ‍ॅप तत्काळ डाऊनलोड करणे शक्य होणार आहे.
महावितरणच्या वीजबिलाची रंगसंगती गेल्या अनेक वर्षांपासून एकसारखीच होती. त्याशिवाय अनेक प्रकारची माहिती आणि जाहिरातींचा भरणा यामुळे नागरिकांना आवश्यक माहिती शोधावी लागत असे. एकाच रंगसंगतीत येणारे वीजदेयक बदलण्याच्या दृष्टीने महावितरणने प्रयत्न केला आहे. नव्या स्वरूपातील वीजबिल ग्राहकांना वितरित करण्यात येत आहे. जुन्या बिलाच्या तुलनेत ते सुटसुटीत; तसेच रंगसंगतीमुळे अधिकच आकर्षक झाले आहे. विशेष म्हणजे सद्य:स्थितीत बारकोडपेक्षाही अधिक वापर असलेला ‘क्यूआर’ (क्विक रिस्पॉन्स) कोड या वीजबिलावर आहे. याद्वारे महावितरणचे मोबाईल अ‍ॅप थेट डाऊनलोड करता येत आहे. मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड करून घेतलेल्या क्यूआर कोड रीडरच्या माध्यमातून वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाईल अ‍ॅपची लिंक मिळत आहे.

Web Title: MSEDCL app will get one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.