महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाला प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:23+5:302021-04-18T04:09:23+5:30
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणमधील १४ कर्मचारी संघटनांच्या सुमारे १४५ पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी संवाद साधला. ...
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणमधील १४ कर्मचारी संघटनांच्या सुमारे १४५ पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
प्रादेशिक संचालक नाळे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून पुणे प्रादेशिक विभागात ८६९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ६५४ कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत २१५ कर्मचारी रुग्णालय व घरी उपचार घेत आहेत तर २२ सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही सर्व वयोगटांसाठी मोठी धोकादायक आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच ग्राहकसेवेचे कर्तव्य बजावताना आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. महावितरणमधील सर्व वयोगटातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी आरोग्य खाते व स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.