महावितरणने सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी - हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:12 AM2021-03-27T04:12:27+5:302021-03-27T04:12:27+5:30

पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची भूमिका असायला हवी, मात्र महाविकास आघाडी सरकार हे सध्या अडचणीत असलेल्या ...

MSEDCL should stop forced electricity bill collection - Harshvardhan Patil | महावितरणने सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी - हर्षवर्धन पाटील

महावितरणने सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी - हर्षवर्धन पाटील

Next

पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची भूमिका असायला हवी, मात्र महाविकास आघाडी सरकार हे सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची वीज खंडित करीत आहे. या सरकारमधील विविध पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी व मोफत विजेचे आश्वासन दिले होते. परंतु या शब्दाला जागणे दूरच उलट वीज रोहित्रे बंद करून शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महाविकास आघाडी सरकार हे फसवे सरकार आहे. सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे.

कोरोना, अतिवृष्टीमुळे शेती नुकसानीत जाऊन शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. अशा अडचणीतही या मोहिमेत आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी वीज बिलाची रक्कम भरलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आणखी त्रास न देता महाविकास आघाडी सरकारने तत्काळ निर्णय घेऊन शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

--

Web Title: MSEDCL should stop forced electricity bill collection - Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.