सासवडमध्ये महावितरणची पावसाळापूर्व कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:49+5:302021-05-11T04:10:49+5:30
वर्षभर शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक मोठमोठी विकासकामे होत असतात. यामध्ये रस्तेदुरुस्ती, नवीन इमारती, विहिरींची कामे यामुळे ठिकठिकाणी विद्युत ...
वर्षभर शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक मोठमोठी विकासकामे होत असतात. यामध्ये रस्तेदुरुस्ती, नवीन इमारती, विहिरींची कामे यामुळे ठिकठिकाणी विद्युत व्यवस्थेत बदल केलेला असतो आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो पूर्ववत करावा लागतो. सासवडसह पुरंदर तालुक्यात विद्युत विभागाने दुरुस्तीच्या कामांची मोहीम हाती घेतली असून नादुरुस्त असलेली, तसेच अर्धवट असलेली सर्व कामे केली जात आहेत. पावसाळ्याला महिना राहिला असून पावसाळ्यात ही कामे करताना कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते.
पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागात नवीन पोल उभे करणे, शेतकऱ्यांच्या विहिरीवर नवीन विद्युत कनेक्शन जोडणे, गावांच्या मुख्य लाईनवरील दुरुस्त्या करणे, मुख्य डीपीची दुरुस्ती, ज्या ठिकाणचे जंप तुटले असतील ते बसविणे, तुटलेल्या विद्युत तारा जोडणे, नवीन लाईन ओढणे ही कामे केली जात आहेत.
पावसाळ्यात नागरिकांना विद्युत पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी दुरुस्तीची कामे आताच होणे आवश्यक आहे. भर पावसाळ्यात अशी कामे करताना विद्युत कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतो. दुरुस्तीची कामे सुरु असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
उमेश ससाणे, उपकार्यकारी अभियंता, सासवड विभाग
१० सासवड