Pune Water Supply: पुणेकरांना गढुळ पाण्याचा पुरवठा ,नागरिकांनी पाणी उकळुन प्यावे, महापालिकेचे आवाहन

By राजू हिंगे | Published: July 28, 2024 05:40 PM2024-07-28T17:40:17+5:302024-07-28T17:41:08+5:30

खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या गढूळतेमध्ये वाढ होउन ती २२३ ते ३०० एनटीयु पर्यत वाढ झाली आहे

Muddy water supply to Pune residents citizens should boil and drink drinking water | Pune Water Supply: पुणेकरांना गढुळ पाण्याचा पुरवठा ,नागरिकांनी पाणी उकळुन प्यावे, महापालिकेचे आवाहन

Pune Water Supply: पुणेकरांना गढुळ पाण्याचा पुरवठा ,नागरिकांनी पाणी उकळुन प्यावे, महापालिकेचे आवाहन

पुणे: शहराला पाणीपुरवठा करणा०या खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाउस झाला आहे. त्याने शहराच्या अनेक भागात गढुळ पाण्याचा पुरवठा (Pune Water Supply) होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे असे आवाहन पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) केले आहे.

पुणे महापालिकेने नव्याने उभारलेली जलशुध्दीकरण केंद्र १५०एनटीयु (नेफेलो टरबीडीटी युनिट)या प्रमाणाची गढूळता निवारत आहे. जुनी जलशुध्दीकरण केंद्र 40 एनटीयु पर्यंतचे पाणी हाताळू शकतात. खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या गढूळतेमध्ये वाढ होउन ती २२३ ते ३०० एनटीयु पर्यत वाढ झाली आहे. जलशुध्दीकरण केंद्राच्या क्षमतेच्या पेक्षा खूपच जास्त प्रमाणात गढूळता आहे. त्यामुळे गढूळ पाणी वितरित होत आहे. सर्व जलकेंद्रातून वितरित होणाऱ्या पाण्याचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

त्यामुळे पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनर पिण्याचे पाणी उकळुन प्यावे. उघड्यावरचे अन्न, शिळे अन्न सेवन करू नये. पिण्याचे पाणी उकळुन व गार करून झाकून ठेवावे. नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्यावी साठवणुकीचे पाणी झाकून ठेवावे, पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवू नये.आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा. पिण्याच्या पाण्याची भांडी आठवड्यातुन एकदा रिकामी करून धुवून पुसून कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळया पाण्यामधे होवू देऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

Web Title: Muddy water supply to Pune residents citizens should boil and drink drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.