पुण्यात तरुणावर भरदिवसा काेयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 19:42 IST2019-01-27T18:01:42+5:302019-01-27T19:42:48+5:30
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहाजवळ एका तरुणावर चार तरुणांनी काेयत्याने वार करत त्याचा खून केला.

पुण्यात तरुणावर भरदिवसा काेयत्याने वार
पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहाजवळ एका तरुणावर चार तरुणांनी काेयत्याने वार करत त्याचा खून केला. राेहित साळवी (वय 27) असे वार करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास चार तरुणांनी फन टाईम चित्रपटगृहाजवळ राेहितवर काेयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात राेहित गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताचवरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी असलेल्या सीसीटिव्हीच्या माध्यमातून आराेपींचा शाेध घेण्यात येत आहे. सिंहगड राेड पाेलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. ३१ डिसेंबर रोजी झालेल्या वादातून रोहितचा खुन केल्याचे सांगण्यात येत आहे़
दरम्यान या महिन्यातील सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतीस हा तिसरा खून असून यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.