Mukta Tilak: मुक्ताताईंची कर्तव्यनिष्ठा अन् कमिटमेंट; 'व्हील चेअर'वर येऊन केलं होतं मतदान, सगळ्यांनीच केला होता सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 06:12 PM2022-12-22T18:12:03+5:302022-12-22T18:37:08+5:30

Mukta Tilak passed away: राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीत प्रत्येक मत महत्त्वाचं असताना आजारी असतानाही 'व्हील चेअर'वर पुण्याहून मुंबईला येऊन मुक्ता टिळक यांनी मतदान केलं होतं.

Mukta Tilak: MLA Mukta Tilak came to Mumbai in an ambulance and voted in the Legislative Council elections. | Mukta Tilak: मुक्ताताईंची कर्तव्यनिष्ठा अन् कमिटमेंट; 'व्हील चेअर'वर येऊन केलं होतं मतदान, सगळ्यांनीच केला होता सलाम!

Mukta Tilak: मुक्ताताईंची कर्तव्यनिष्ठा अन् कमिटमेंट; 'व्हील चेअर'वर येऊन केलं होतं मतदान, सगळ्यांनीच केला होता सलाम!

googlenewsNext

Mukta Tilak passed away: भाजपाच्या आमदार व माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचे आज (गुरूवारी) दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्रीली टिळक, सून, जावाई असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. उपचारादरम्यान आज दुपारी त्यांची खासगी रूग्णालयात प्राणज्योत मालवली. उद्या(शुक्रवारी) सकाळी 9 ते 10 या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवास स्थानी त्यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीत प्रत्येक मत महत्त्वाचं असताना आजारी असतानाही 'व्हील चेअर'वर पुण्याहून मुंबईला येऊन मुक्ता टिळक यांनी मतदान केलं होतं. मुक्ता टिळक यांनी कर्तव्यनिष्ठा अन् कमिटमेंट दाखवल्याने भाजपाच्या फायटर आमदार म्हणून त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. मुक्ता टिळक जेव्हा मतदानासाठी पोहोचल्या त्यावेळी सर्व आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांचे स्वागत केले. यावेळी देवेंद्र फडणवीसांसह, गिरिश महाजन, प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. 

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या आमदार होत्या. मुक्ता टिळक यांनी 2017 ते 2019 या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले. त्या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू श्रीकांत टिळक यांच्या सूनबाई आहेत. बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत. टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत. पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचे शिक्षणही घेतले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.

आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर 2017 मध्ये त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. त्या महापौर असतानाच 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या. मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Mukta Tilak: MLA Mukta Tilak came to Mumbai in an ambulance and voted in the Legislative Council elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.