Mukta Tilak passed away: मुक्ता टिळक यांच्या निधनाने निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला- प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांनी वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 07:24 PM2022-12-22T19:24:56+5:302022-12-22T19:26:02+5:30

"मुक्ताताईंना लोकमान्य टिळक यांच्या घराण्याचा वारसा लाभला होता व तो त्यांनी जबाबदारीने जपला"

Mukta Tilak passed away BJP Maharashtra Chief Chandrashekhar Bawankule pays tribute | Mukta Tilak passed away: मुक्ता टिळक यांच्या निधनाने निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला- प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांनी वाहिली आदरांजली

Mukta Tilak passed away: मुक्ता टिळक यांच्या निधनाने निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला- प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांनी वाहिली आदरांजली

googlenewsNext

Chandrashekhar Bawankule on Mukta Tilak passed away: भाजपाच्या आमदार व पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. उपचारादरम्यान ५७व्या वर्षी खासगी रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल, मुलगी चैत्राली, सून, जावई असा परिवार आहे. मुक्ता टिळक या भाजपाच्या एक अतिशय निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या. मुक्ताताईंच्या निधनाने आम्ही एक निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला, अशा भावना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने कर्तबगार व निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्पण केली. मुक्ता टिळक यांनी नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून सक्षमपणे लोकसेवा केली. शहरातील राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक जीवनात त्या सक्रीय होत्या. त्यांना लोकमान्य टिळक यांच्या घराण्याचा वारसा लाभला होता व तो त्यांनी जबाबदारीने जपला, असे ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे काम करताना त्यांनी पक्षाचा 'संगठन सर्वोपरी', हा मंत्र जपला आणि आपल्या आचरणाने कार्यकर्त्यांसमोर उदाहरण निर्माण केले. त्यांच्या निधनाने पक्ष संघटनेची हानी झाली आहे. आपण त्यांना भाजपा, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत त्यांनी भावनांना वाट करून दिल्या.

मुक्ता टिळक यांचे पार्थिव उद्या सकाळी ९ ते १० या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Mukta Tilak passed away BJP Maharashtra Chief Chandrashekhar Bawankule pays tribute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.