मुळा-मुठा, भीमा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:53+5:302021-07-24T04:08:53+5:30
राहू येथील मुळा-मुठा नदीवरील तर भीमा नदीवरील विठ्ठलवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. या दोन्ही नद्याच्या ...
राहू येथील मुळा-मुठा नदीवरील तर भीमा नदीवरील विठ्ठलवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. या दोन्ही नद्याच्या काठावरील विद्युत पंप पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेले चार दिवस धरण क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे या दोन्ही नद्यांना पूर आला आहे.
गेली चार ते पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांना दिलासा मिळाला असून पिके जोमदार आले आहेत, मात्र फळबागांना हा पाऊस हानिकारक मानला जात आहे. डाळिंब पिकांना या पावसाचा मोठा फटका बसल्याने डाळिंब बागायतदार चिंतेत असल्याचे एकंदरीत चित्र आहे
धरण क्षेत्रात पाऊस असाच सुरू राहिला तर या दोन्ही नद्यांवरील सर्वच्या सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आव्हान राहू येथील गाव कामगार तलाठी अर्जुन स्वामी यांनी केले आहे.
--
फोटो क्रमांक : २३ राहू मुळा मूठा नदीपूर
फोटो ओळ राहू येथील मुळा मुठा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे