मुळशी धरणात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू, होळीच्या दिवशी घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:07 AM2019-03-22T01:07:37+5:302019-03-22T01:07:54+5:30

मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होळीच्या दिवशी आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

In the Mulshi Dam, the youth drowned, Holi happened on the day of the incident | मुळशी धरणात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू, होळीच्या दिवशी घडली घटना

मुळशी धरणात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू, होळीच्या दिवशी घडली घटना

Next

पौड : मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होळीच्या दिवशी आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अजय परशुराम घोडके (वय २२, रा. पाषाण) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याचा मृतदेह एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी धरणाबाहेर काढला.

या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शी पंकज मोरे यांनी पोलिसांना दिली. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. परंतु अंधार पडल्याने त्याचा शोध घेता आला नव्हता. गुरुवारी पोलीस, एनडीआरएफचे जवान व मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक अजयचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. पाषाण येथील रहिवासी अससलेला अजय हा एका कुरियर कंपनीत कामाला होता. होळीची सुट्टी असल्याने तो सकाळीच मित्रांसमवेत मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. दुपारी २ ते ३ च्या सुमारास तो मित्रांसोबत मुळशी खुर्द गावाच्या हद्दीत धरणात पोहण्यासाठी उतरला. पाण्यात बराच आत गेल्याने पोहताना त्याला दम लागल्याने तो बुडाला.

मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते व एनडीआरएफच्या शोधपथकाने गुरुवारी दिवसभर शोध घेतल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास अजयचा मृतदेह सापडला. यावेळी पौडचे पोलीस उपनिरीक्षक लवटे, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: In the Mulshi Dam, the youth drowned, Holi happened on the day of the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.