बहुउद्देशीय पथकेच ठरताहेत ‘उपद्रवी’

By admin | Published: May 18, 2014 11:44 PM2014-05-18T23:44:14+5:302014-05-18T23:44:14+5:30

शहरातील सार्वजनिक ठिकाणचे उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेने नेमलेले बहुउद्देशीय पथके (एनडी स्कॉड) महापालिकेचीच डोकेदुखी ठरू लागली आहेत.

Multi-purpose teams are 'rowdy' | बहुउद्देशीय पथकेच ठरताहेत ‘उपद्रवी’

बहुउद्देशीय पथकेच ठरताहेत ‘उपद्रवी’

Next

पुणे : शहरातील सार्वजनिक ठिकाणचे उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेने नेमलेले बहुउद्देशीय पथके (एनडी स्कॉड) महापालिकेचीच डोकेदुखी ठरू लागली आहेत. या पथकातील काही कर्मचार्‍यांकडून चुकीच्या पद्धतीने कामकाज केले जात असल्याने आता या पथकाचे दंड करण्याचे अधिकार मर्यादित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. अनेक नागरिकांकडून रस्त्यावर कचरा टाकणे, उघड्यावर शौचास बसणे, रस्त्यावर थुंकणे, लघवी करणे, सार्वजनिक ठिकाणच्या भिंती घाण करणे, नदीपात्र, नाल्यांमध्ये कचरा, राडारोडा टाकणे असे प्रकार केले जातात. या नागरिकांवर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर एनडी स्कॉडची स्थापना करण्यात आली आहे. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार, या पथकात ६९ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, त्यातील काही कर्मचार्‍यांकडून अधिकारांचा गैरवापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी पथारी ओळखपत्र मिळवून देण्यासाठी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील एका कर्मचार्‍याने बनावट पावत्या दिल्याचे उघडकीस आले आहे, तर काही कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई करीत आहेत. तसेच, इतर कामात हस्तक्षेप करीत असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. त्यामुळे या पथकांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून, त्याबाबतच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Multi-purpose teams are 'rowdy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.