मल्टिबॅरल गायडेड रॉकेट सिस्टीम : ८० किमीपर्यंत मारक क्षमता, पिनाका करणार लक्ष्याचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 09:13 AM2017-12-23T09:13:45+5:302017-12-23T09:13:57+5:30
कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भारतीय बनावटीची ‘पिनाका मल्टिबॅरल रॉकेट सिस्टीम’ जवळपास ८० किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करून त्याचा वेध घेण्यास सक्षम होणार आहे.
- निनाद देशमुख
पुणे - कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भारतीय बनावटीची ‘पिनाका मल्टिबॅरल रॉकेट सिस्टीम’ जवळपास ८० किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करून त्याचा वेध घेण्यास सक्षम होणार आहे. पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटतर्फे गायडेड पिनाकाचे नवे डिझाईन तयार करण्यात आले असून, सरकारी आणि खासगी कंपन्यांतर्फे त्याचा विकास करण्यात येत आहे. या शस्त्राच्या काही चाचण्या यशस्वी झाल्या असून, आणखी काही चाचण्यांनंतर ते लष्करात दाखल होणार आहे.
युद्धकाळात वेगवान हालचाली करून शत्रूची ठिकाणे काही क्षणांत नष्ट करण्यासाठी वेगवान रॉकेट लाँचर सिस्टीमची मागणी लष्कराने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)कडे केली होती. त्यानुसार, याआधी पिनाका मार्क वन आणि मार्क टू या मल्टिबॅरल रॉकेट सिस्टीमची निर्मिती पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, टाटा पॉवर आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांतर्फे विकसित करण्यात आले आहे. फक्त ४४ सेकंदांत १२ रॉकेट डागण्याची या शस्त्रात क्षमता आहे.
कारगिल युद्धात बोफोर्स तोफांबरोबर उंच डोंगरावरील शत्रूंचे बंकर नष्ट करण्यात या शस्त्राने मोलाची भूमिका बजावली होती. सध्या या शस्त्राची मारक क्षमता ६० किलोमीटर एवढी असून, आता त्यात वाढ करण्यात येईल. शत्रूची ठिकाणे अचूक टिपण्यासाठी या रॉकेट यंत्रणेत आता दिशादर्शक यंत्रणा बसवणार आहे. अँटी रडार यंत्रणाही यावर बसवण्यात येणार आहे. रॉकेटच्या डिझाईनमध्ये बदल करून तीन स्टेज यंत्रणा बसवण्यात येणार असल्याने या शस्त्राची मारक क्षमता जवळपास ८० ते १२० किमीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. नव्या गायडेड रॉकेट लाँचरचे डिझाईन पुण्यातील एआरडीईच्या तंत्रज्ञांनी बनवले आहे. अतिशय वेगवान हालचाली करण्यासाठी लाँचर वाहनाची निर्मिती टाटा पॉवर आणि लार्सन अँड टुब्रो कंपन्यांनी बनवली आहे.
नव्या रॉकेटप्रणालीमुळे मारक क्षमतेत वाढ
मार्क वन आणि मार्क २ पिनाका मल्टिबॅरल रॉकेट सिस्टीममधील रॉकेट दोन टप्प्यांत कार्य करीत होते. या रॉकेटच्या अग्रभागी असलेले शस्त्र उचित लक्ष्यापर्यंत पोहोचविण्यासाठी रॉकेटचा वापर केला जात होता. नव्या यंत्रणेद्वारे रॉकेट प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. या यंत्राच्या निर्मितीत खासगी कंपन्यांचाही वाटा असून, क्षेपणास्त्र डागल्यानंतर एकाच टप्प्यात लक्ष्यावर मारा करू शकते. यामुळे दूरपर्यंत अंतर गाठण्याची क्षमता विकसित झाली आहे.
८० किमीपर्यंत हल्ला करण्याची क्षमता वाढली असून, ती १२० किमीपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रयत्न दोन रेजिमेंट उभारण्यासाठी....
लष्कराच्या भात्यात या यंत्रणेच्या स्वतंत्र रेजिमेंट आहेत. गायडेड पिनाकाच्या आणखी दोन रेजिमेंट तयार करण्यात येणार आहेत. आॅर्डनन्स फॅक्टरी बोर्ड, टाटा पॉवर आणि लार्सन अँड टुब्रो रॉकेटची निर्मिती करणार आहेत.