मुंबई-पुणे मार्ग : ‘हायपरलूप वन’कडून पाहणी; पदाधिकाऱ्यांकडून हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 02:36 AM2018-03-21T02:36:15+5:302018-03-21T02:36:15+5:30

पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या नवीन प्रकारच्या वाहतुकीचा वापर करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून मंगळवारी ‘हायपरलूप वन’या कंपनीच्या पदाधिकाºयांनी प्रस्तावित मार्गाची पहाणी केली.त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.

 Mumbai-Pune route: 'Hyperloop One' inspection; Movement from office bearers | मुंबई-पुणे मार्ग : ‘हायपरलूप वन’कडून पाहणी; पदाधिकाऱ्यांकडून हालचाली

मुंबई-पुणे मार्ग : ‘हायपरलूप वन’कडून पाहणी; पदाधिकाऱ्यांकडून हालचाली

Next

पुणे : पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या नवीन प्रकारच्या वाहतुकीचा वापर करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून मंगळवारी ‘हायपरलूप वन’या कंपनीच्या पदाधिकाºयांनी प्रस्तावित मार्गाची पहाणी केली.त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.कंपनीकडून पुढील सहा महिन्यात या संदर्भातील व्यवहार्यता अभ्यास अहवाल पीएमआरडीएमार्फत शासनास सादर केला जाणार आहे.
महाराष्टÑ शासन आणि लॉस एंजेलिसमधील ‘हायपरलूप’ यांच्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे - मुंबई हायपरलूप संदर्भात सामंजस्य करार झाला आहे. हायरपरलूप कंपनीकडून पुणे-मुंबई मार्गाचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल पीएमआरडीएला सादर करण्यात आला. आता अतिजलद वाहतुकीची सुविधा देणाºया या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पीएमआरडीए आणि हायपरलूप कंपनीकडून संयुक्तपणे हा अहवाल केला जात आहे.त्याचा सर्व खर्च हायपरलूपकडून करणार आहे. मुंबई आणि पुणे विभागांतील महानगर प्रदेशांना हायपरलूप तंत्रज्ञानाने जोडल्यास २० मिनिटांपेक्षा कमी वेळेत प्रवास करणे शक्य होणार आहे.मात्र,त्याची व्यवहार्यता तपासून मगच हा प्रकल्प करण्यात येणार आहे.

- हायपरलूपसाठी आवश्यक परवानग्या,त्यासाठी लागणारी जमीन,अभियांत्रिकी आव्हाने याबाबतची पाहणी ‘हायपरलूप वन’च्या पदाधिका-यांकडून सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून कंपनीचे पदाधिकारी मुंबईत आहेत. मंगळवारी कंपनीच्या पदाधिकाºयांनी प्रस्तावित मार्गाची पहाणी केली.पुढील सहा महिन्यात त्यांच्याकडून यावरील व्यवहार्यता अभ्यास अहवाल प्राप्त होईल. हा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल.शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येईल, असे किरण गित्ते यांनी सांगितले.

Web Title:  Mumbai-Pune route: 'Hyperloop One' inspection; Movement from office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.