मुंबई विद्यापीठाला जेतेपद, पश्चिम विभागीय महिला टेनिस स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:16 AM2018-01-01T05:16:51+5:302018-01-01T05:17:02+5:30
मुंबई विद्यापीठ संघाने तीन सामन्यांत विजय नोंदवित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला टेनिस साखळी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला दोन विजयांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पुणे : मुंबई विद्यापीठ संघाने तीन सामन्यांत विजय नोंदवित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला टेनिस साखळी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला दोन विजयांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या टेनिस कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत मुंबई संघाने देवी अहिल्या विश्वविद्यालय (इंदूर), गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाचा पराभव केला. दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाच्या महिलांनी देवी अहिल्या विश्वविद्यालय आणि गुजरात विद्यापीठ संघाला नमविले. तसेच, देवी अहिल्या विश्वविद्यालय संघाला तृतीय क्रमांक व अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र झालेले हे संघ पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धा विशाखापट्टणम येथील गीतम विद्यापीठात ६ ते ८ जानेवारी २०१८ दरम्यान होणार आहेत.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, नवी दिल्ली येथील भारतीय विश्वविद्यालय संघाच्या प्रतिनिधी डॉ. शालिनी मल्होत्रा, तसेच विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने आणि सहायक क्रीडा संचालक डॉ. दत्तात्रय महादम यांच्या हस्ते करण्यात आला.
निकाल (साखळी सामने) :
१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वि. वि. देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर (२-०) : १ ली एकेरी - प्रगती सोलनकर वि. वि. तुहीना चोप्रा (६-४, ६-४), २ री एकेरी- स्नेहल माने वि. वि. गणेशी अनिया (६-२, ६-१).
२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे वि. वि. गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद (२-१) १ ली एकेरी- प्रगती सोलनकर पराभूत वि. कोसंबी सिन्हा (६-४, ०-६, ४-६), २ री एकेरी- स्नेहल माने वि. वि. ऊर्मी पंड्या (६-४, ६-४) दुहेरी - स्नेहल माने व प्रगती सोलनकर वि. वि. कोसंबी सिन्हा व ऊर्मी पंड्या (६-०, ६-३).
३) देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर वि. वि. गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद (२-१) १ ली एकेरी - गणेशी अनिया वि. वि. कोसंबी सिन्हा (६-१, ६-२), २ री एकेरी - तहीना चोप्रा पराभूत वि. ऊर्मी पंड्या (३-६, २-६), दुहेरी गणेशी अनिया व तहीना चोप्रा वि. वि. कोसंबी सिन्हा व ऊर्मी पंड्या (६-१, ४-६, १०-६).
४) मुंबई विद्यापीठ, मुंबई वि. वि. देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर (२-०).
१ ली एकेरी- परवीना शिवेकर वि. वि. गणेशी अनिया (६-१, ७-५), २ री एकेरी - दक्षता पटेल वि. वि. महिमा हार्दिया (६-०, ६-०).
५) मुंबई विद्यापीठ, मुंबई वि. वि. गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद (२-०).
१ ली एकेरी- परवीन शिवेकर वि. वि. कोसंबी सिन्हा (६-०, ६-१), २ री एकेरी- मिहिका यादव वि. वि. ऊर्मी पंड्या (६-२, ६-१).
६) मुंबई विद्यापीठ, मुंबई वि. वि. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (२-०).
१ ली एकेरी- मिहिका यादव वि. वि. स्नेहल माने (६-२, ६-१), २ री एकेरी- परवीन शिवेकर वि. वि. प्रगती सोलनकर (६-४, ६-२).