बाणेरमधील तीन पब रेस्टॉरंटवर पालिकेची कारवाई, पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले

By निलेश राऊत | Published: May 25, 2024 07:10 PM2024-05-25T19:10:07+5:302024-05-25T19:12:05+5:30

शनिवारी दुपारी बांधकाम विभाग झोन तीनच्यावतीने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली...

Municipal action against three pub restaurants in Baner, demolition of papers and unauthorized constructions | बाणेरमधील तीन पब रेस्टॉरंटवर पालिकेची कारवाई, पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले

बाणेरमधील तीन पब रेस्टॉरंटवर पालिकेची कारवाई, पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले

पुणे :बाणेर येथील तीन रूफटॉप पब रेस्टॉरंटवर (हॉटेल) महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करून, तेथील पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले. शनिवारी दुपारी बांधकाम विभाग झोन तीनच्यावतीने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

बाणेर येथील हॉटेल इमेज रेस्टोबार, आइस अँड फायर ( बाणेर हायवे लगत) आणि हॉटेल हाईव्ह (रांका ज्वेलर्सच्यावर बाणेर) येथे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ११ हजार ९२५ चौरस फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले. सदरच्या कारवाईत बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, बांधकाम विभागा झोन तीनचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्यासह उप अभियंता प्रकाश पवार, कनिष्ठ अभियंता अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर व दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने ही कारवाई केली गेली.

९ रूफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल -

बाणेर मधील एकूण ९ रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली.

Web Title: Municipal action against three pub restaurants in Baner, demolition of papers and unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.