महापालिका अंदाजपत्रक : सत्ताधाºयांकडून स्वागत; विरोधकांकडून वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:09 AM2018-03-06T04:09:26+5:302018-03-06T04:09:26+5:30

उत्पन्नाचा अंदाज घेत कोणताही फुगवटा न आणता शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनांसाठी भरीव तरतूद असलेले अत्यंत वास्तववादी अंदाजपत्रक सादर केल्याचे सांगत सत्ताधारी सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले. तर उत्पन्न आणि खर्चाचा कोणताही ताळमेळ नसलेले, आत्मविश्वास हरवलेले

 Municipal budget: Welcome from power projects; Vachadda from opponents | महापालिका अंदाजपत्रक : सत्ताधाºयांकडून स्वागत; विरोधकांकडून वाभाडे

महापालिका अंदाजपत्रक : सत्ताधाºयांकडून स्वागत; विरोधकांकडून वाभाडे

Next

पुणे - उत्पन्नाचा अंदाज घेत कोणताही फुगवटा न आणता शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनांसाठी भरीव तरतूद असलेले अत्यंत वास्तववादी अंदाजपत्रक सादर केल्याचे सांगत सत्ताधारी सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले. तर उत्पन्न आणि खर्चाचा कोणताही ताळमेळ नसलेले, आत्मविश्वास हरवलेले, फसवे व दिशाहीन अंदाजपत्रक असल्याचे सांगत विरोधकांनी सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे वाभाडे काढले.
महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू झाली तेव्हा सभागृहात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सदस्य उपस्थित होते. तसेच स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनादेखील थोडा उशीर झाला. यामुळे अध्यक्ष आल्याशिवाय अंदाजपत्रकावर चर्चा सुरु करू नये अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. मोहोळ आल्यानंतर चर्चेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रथम काँगे्रसचे आबा बागुल यांनी सुरुवात करत प्रशासन आणि स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर आक्षेप घेतला. कायद्यानुसार अंदाजपत्रकामध्ये सुरुवातीची रक्कम (ओपनिंग बॅलन्स) दाखविणे बंधनकारक असताना स्थायी समितीच्या अंदाजपत्रकामध्ये तो दाखविला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. बागुल यांनी प्रामुख्याने जमेच्या बाजूवरच अधिक चर्चा केली. तर राजेश येनपुरे, अदित्य माळवे यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक पुणेकरांच्या आश्वासनांची पूर्तता करणारे असून, मूलभूत गरजांसाठी भरघोस तरतूद असलेले अंदाजपत्रक असल्याचे सांगितले. पदाधिकारी, सदस्य पुणेकरांचा विचार करून योजना तयार करतात, पण प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुढे जात नसल्याचे सांगितले. अ‍ॅड. हाजी गफूर पठाण यांनी, या वेळीदेखील विरोधकांना डावलण्यात आले असून, खूपच तुटपुंजे बजेट दिल्याचे सांगितले.
सायली वांजळे यांनी महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी आरसीबी व डीटीआरकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. दीपक मानकर यांनी शिवसृष्टीसाठी तरतूद केल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन केले, परंतु ही तरतूद खूपच कमी असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.

बालगंधर्व जमीनदोस्त करण्यास विरोध
महापालिकेच्या सन २०१८-१९च्या अंदाजपत्रकामध्ये बालगंधर्व रंगमंदिर नव्याने उभारण्यात येणार असून, यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु बालगंधर्व रंगमंदिर शहराच्या वैभावात भर पाडणारी वास्तू असून, ती पाडण्यास आमचा विरोध असल्याचे दीपक मानकर यांनी सांगितले. बालगंधर्व येथे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून, येथे समांतर अशी दुसरी इमारत उभारावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

सुभाष जगताप यांनी अंदाजपत्रकावर चर्चा करत चांगलाच समाचार घेतला. सत्ताधाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दर वर्षी करामध्ये वाढ करावी लागणार आहे. ११ गावे समाविष्ट झाल्याने शहराच्या हद्दीत ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यामुळे शासनाकडे अधिकच्या जीएसटीची मागणी करायला पाहिजे. परंतु सत्ताधारी आत्मविश्वास हरवून बसेल आहेत. यामुळे राज्य व केंद्र शासनाकडूनदेखील अपेक्षित निधी पुण्याला मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  Municipal budget: Welcome from power projects; Vachadda from opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.