नगरपालिका महानगरपालिका वाढीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:13+5:302021-08-24T04:13:13+5:30

शिक्षक संघाचे शरद पवारांना साकडे शिक्षक संघाचे शरद पवारांना साकडे बारामती : पुणे, पनवेल व बारामती नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रात ...

Municipal Corporation Increased | नगरपालिका महानगरपालिका वाढीव

नगरपालिका महानगरपालिका वाढीव

Next

शिक्षक संघाचे शरद पवारांना साकडे

शिक्षक संघाचे शरद पवारांना साकडे

बारामती : पुणे, पनवेल व बारामती नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शिक्षकांसह वर्ग करण्यात याव्यात अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी केली.

पवार यांची त्यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. सन २०१५-१६ पासून पुणे, पनवेल महानगरपालिका व बारामती नगरपालिकेत हद्दवाढ झाल्याने नवीन गावे समाविष्ट करण्यात आली. तेथील ग्रामपंचायत बरखास्त होऊन प्रशासकीय व महसुली कामकाज महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनामार्फत सुरू आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षकांचे वर्गीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही.

काही ठिकाणी ग्राम विकास विभागाच्या दिनांक २५ जुलै २०१९ च्या शासन निर्णयामुळे वर्गीकरण प्रक्रियेस विलंब होत आहे. तर, काही ठिकाणी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमचा संदर्भ देऊन शिक्षक वर्गीकरणास असहमती दर्शवली जात आहे. त्यामुळे शिक्षकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीतून मार्ग निघावा, याकरिता शिक्षक संघाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साकडे घातले आहे.

ग्राम विकास विभागाच्या दिनांक २५ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट गावातील शाळा वर्ग करताना जिल्ह्यातील शिक्षकांकडून विकल्प भरून घेऊन सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकवर्ग करावेत, असे सूचित केले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्याची प्रक्रिया ढवळून निघेल व शिक्षक वर्गीकरणाची प्रक्रिया क्लिष्ट होईल. तसेच अनेक महिला व दिव्यांग शिक्षकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

शिक्षक वर्गीकरण करताना सध्या शाळेवर कार्यरत शिक्षकांकडून विकल्प भरून घ्यावेत. ज्यांचा वर्गीकरणास होकार आहे त्यांना वर्ग करण्यात यावे व ज्यांचा वर्गीकरणास नकार आहे त्यांच्याऐवजी सेवाज्येष्ठ शिक्षकांना स्वेच्छेने वर्ग करण्यात यावे. सदरची दुरुस्ती २५ जुलै २०१९ च्या शासन निर्णयात व्हावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.

सदर शासन निर्णयात दुरुस्ती होण्याकरिता आपले निवेदन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे माझ्या शिफारशीसह पाठवतो, पवार यांनी सांगितले. या वेळी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते महादेव गायकवाड, अध्यक्ष हनुमंत शिंदे, सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली.

२३०८२०२१ बारामती—०१

—————————————

Web Title: Municipal Corporation Increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.