महापालिकेच्या ४५ अ‍ॅम्ब्युलन्स ऑक्सिजन सुविधेसह कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:12 AM2021-03-27T04:12:16+5:302021-03-27T04:12:16+5:30

पुणे : पुणे महापालिकेकडे सध्या ६२ अ‍ॅम्ब्युलन्स कार्यरत असून, यापैकी ४५ अ‍ॅम्ब्युलन्स आॅक्सिजनसुविधेसह उपलब्ध आहेत़ या सुविधेसाठी नागरिकांनी १०८ ...

Municipal Corporation operating 45 ambulances with oxygen facility | महापालिकेच्या ४५ अ‍ॅम्ब्युलन्स ऑक्सिजन सुविधेसह कार्यरत

महापालिकेच्या ४५ अ‍ॅम्ब्युलन्स ऑक्सिजन सुविधेसह कार्यरत

Next

पुणे : पुणे महापालिकेकडे सध्या ६२ अ‍ॅम्ब्युलन्स कार्यरत असून, यापैकी ४५ अ‍ॅम्ब्युलन्स आॅक्सिजनसुविधेसह उपलब्ध आहेत़ या सुविधेसाठी नागरिकांनी १०८ व नियंत्रण कक्ष क्रमांक ९६८९९३९३८१ या क्रमांकावर संपर्क साधावा़, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे़

पुणे महापालिकेच्या हॉस्पिटलसह जम्बो कोविड हॉस्पिटल व महापालिकेने सामंजस्य करार केलेल्या पुना हॉस्पिटल, दिनानाथ हॉस्पिटल, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल व सिम्बॉयोसिस हॉस्पिटल लवळे येथे उपाचारासाठी बेड मिळण्यासाठी, कोरोनाबाधित अथवा त्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेतील बेड व्यवस्थापन कक्ष ०२०-२५५०२११०/०६/०७/०९ या क्रमांकावर संपर्क साधावा़

शहरातील आयसोलेशन सेंटर / कोविड सेंटर / विविध रूग्णालये येथील रूग्ण व नागरिकांना अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था हवी असल्यास त्यांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील संपर्क क्रमांक ९६८९९३९३८१ व शासनाच्या १०८ या क्रमांकावर संपर्क साधावा़ तर कोविड-१९ बाधित मयत व्यक्तीसाठी शववाहिकेकरिता ९६८९९३९६२८ व ९०११०३८१४८ तसेच ०२०-२४५०३२११ व ०२०-२४५०३२१२ वर संपर्क साधावा़

-----------------------------

Web Title: Municipal Corporation operating 45 ambulances with oxygen facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.