महापालिकेने उभारली ‘मुलांची वाहतूक पाठशाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:55+5:302021-01-19T04:12:55+5:30
पुणे : खेळाच्या स्वरूपात मांडणी केलेले वाहतुकीशी व सुरक्षिततेशी संबंधित चिन्हांचे साईन बोर्ड, छोटे सिग्नल पोल, छोटे रस्ते, सायकल ...
पुणे : खेळाच्या स्वरूपात मांडणी केलेले वाहतुकीशी व सुरक्षिततेशी संबंधित चिन्हांचे साईन बोर्ड, छोटे सिग्नल पोल, छोटे रस्ते, सायकल ट्रॅक, सेल्फी पॉइंट आदी गोष्टींची सांगड घालून, पुणे महापालिकेने १२ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी औंध येथील ब्रेमन चौक येथे ‘मुलांची वाहतुक पाठशाळा’ (चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क) उभारली आहे़
ब्रेमेन चौकालगतच रस्त्याच्या बाजूला एक एकर जागेत सुमारे दीड कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या वाहुतक पाठशाळेचे लवकर लोकार्पण होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली़
मुलांना मनोरंजनातून वाहतूक विषय समजून सांगितल्यास तो अधिक प्रभावी ठरेल, या उद्देशातून उभारलेल्या या पाठशाळेत ४ मिटर रूंदीचा व १६० मिटर लांबीच्या रस्त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे़ त्यात विद्यार्थ्यांकरिता २७ सायकली हेल्मेटसह उपलब्ध करून देण्यात येत आहेत़ रस्त्यावरील दुहेरी मार्गिका, सायकल मार्ग, पार्किंग व्यवस्था, तीन व चार रस्ते मिळणारे चौक, रस्ते मार्किंग, सिग्नल यंत्रणा, सुरक्षित पादचारी क्रॉसिंग, वाहतूक विषयक चिन्हांचे फलक बसविण्यात आले आहेत़
या पाठशाळेत व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांची वाहतुक विषयक सामाजिक प्रबोधनाची व्यंगचित्रेही लावण्यात आली आहेत़ शैक्षणिक सहली व पालकांबरोबर आलेल्या पाल्यांसाठी ही पाठशाळा खुली राहणार असून, लवकरच ती लोकसेवेत कार्यरत होणार असल्याचेही गोजारे यांनी सांगितले़
--------------
फोटो मेल केला आहे़