पालिकेचे पीएमपीएलला वर्षाला तब्बल ५० कोटी, फक्त पासमधील सवलत, दरवाढीच्या विरोधाची दखल नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:41 AM2017-09-12T03:41:13+5:302017-09-12T03:41:27+5:30

पासमधील सवलतीपोटी महापालिका पीएमपीएलला दरवर्षी तब्बल ५० कोटी रुपये अदा करीत असते, तरीही पीएमपीएलने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्या पाससाठीच्या दरामध्ये मोठी वाढ केली, तसेच त्या वाढीला महापालिका पदाधिका-यांनी केलेल्या विरोधाची दखलही पीएमपीएल प्रशासनाने घेतलेली नाही.

Municipal corporation's PMPL has only 50 crores a year, not just pass-discount, price hike | पालिकेचे पीएमपीएलला वर्षाला तब्बल ५० कोटी, फक्त पासमधील सवलत, दरवाढीच्या विरोधाची दखल नाही  

पालिकेचे पीएमपीएलला वर्षाला तब्बल ५० कोटी, फक्त पासमधील सवलत, दरवाढीच्या विरोधाची दखल नाही  

Next

पुणे : पासमधील सवलतीपोटी महापालिका पीएमपीएलला दरवर्षी तब्बल ५० कोटी रुपये अदा करीत असते, तरीही पीएमपीएलने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्या पाससाठीच्या दरामध्ये मोठी वाढ केली, तसेच त्या वाढीला महापालिका पदाधिका-यांनी केलेल्या विरोधाची दखलही पीएमपीएल प्रशासनाने घेतलेली नाही. प्रशासनाच्या या मनमानीमुळे ज्येष्ठ नागरिक व पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
महापालिका पीएमपीएल प्रशासनाला संचलनातील तुटीपोटी दरवर्षी तब्बल १४४ कोटी रुपये देत असते. वर्षाच्या बरोबर सुरुवातीला पीएमपीएल प्रशासनाकडून ही मागणी केली जाते व त्याचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. ही रक्कम वेगळीच, त्याशिवाय महापालिका पीएमपीएल प्रशासन विविध समाजघटकांना प्रवासी पासमध्ये सवलत देत असते. या सवलतीपोटी प्रशासनाला जी तूट येते ती
तूटही महापालिकाच दरवर्षी ५० कोटी रुपये वेगळे देऊन भरून काढत असते. याही रकमेची मागणी पीएमपीएल प्रशासन बरोबर वर्ष संपले, की महापालिकेकडे करीत असते व त्याचा पाठपुरावाही करून पैसे पदरात पाडून घेत असते.
असे असताना पीएमपीएल प्रशासनाने पासच्या दरांमध्ये
अचानक वाढ केली. ज्येष्ठ नागरिकांना ४५० रुपयांमध्ये मिळत असलेल्या पाससाठी आता ७५० रुपये द्यावे लागत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना
६०० रुपये द्यावे लागत होते तिथे
आता ७५० रुपये द्यावे लागतात. विद्यार्थ्यांचा अंतरानुसार असणारा
पास तर बंदच करण्यात आला आहे. त्यामुळे अंतर कमी असेल तर त्यांना रोजच्या रोज तिकीट काढावे लागण्याची कसरत करावी लागते
व ती टाळायची असेल तर मग
७५० रुपयांचा आॅल रूट पास
काढावा लागतो.
महापालिका पदाधिकाºयांनी या दरवाढीला तीव्र विरोध केला होता. महापालिकेच्या वतीने महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे पीएमपीएलच्या संचालक मंडळात आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांनी पासच्या दरवाढीच्या निर्णयावर तीव्र टीका केली होती. तसेच नंतर पदाधिकाºयांनीही व्यवस्थापकीय संचालक तुकाराम
मुंढे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही असेच दिसते आहे.

महापालिकेने पासपोटी देण्यात येत असलेल्या अनुदानात एक पैही कपात केलेली नाही, तरीही ही दरवाढ का करण्यात आली समजत नाही. ती मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली, मात्र त्याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. असे चालणार नाही. आम्ही मुंढे यांची पुन्हा भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत विचारणा करणार आहोत. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी जास्तीत जास्त सवलती द्याव्यात, असेच आमचे धोरण आहे.
- मुरलीधर मोहोळ,
अध्यक्ष, स्थायी समिती,
महापालिका

पीएमपीएलच्या व्यवस्थापनात अनेक चुकीच्या गोष्टी होत्या, त्या कमी करत आणल्या आहेत. पासमध्ये महापालिकेने अर्धे पैसे व पासधारकाने अर्धे पैसे देणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र हे प्रमाण ७० टक्के महापालिका ३० टक्के पासधारक असे होत होते. त्यात निम्मे पैसे पासधारक व निम्मे महापालिका असा बदल करण्यात आला व तो संयुक्तिक आहे.
- सिद्धार्थ शिरोळे,
संचालक-महापालिका

पालिकेकडून पासचे पूर्ण पैसे मिळत असतानाही पीएमपीएल प्रशासनाला दर वाढवण्याचे कारण काय, असे ज्येष्ठ नागरिक संघटना व विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. आता पासधारकांकडून जास्त पैसे घेत असताना पीएमपीएल पुढील वर्षांसाठी पालिकेकडून अनुदान जुन्या दराने घेणार की त्यात कपात करणार, अशीही विचारणा होत आहे.

Web Title: Municipal corporation's PMPL has only 50 crores a year, not just pass-discount, price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.