महापालिकेचे सफाई सेवकांचे पथक कोल्हापूरला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:25+5:302021-07-31T04:11:25+5:30
पुणे : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर व हातकणंगले तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण ...
पुणे : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर व हातकणंगले तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून तेथे स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे काम करण्यासाठी पुणे महापालिकेने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मदतीसाठी ६१ पर्यवेक्षीय कर्मचारी व सफाई सेवकांस मदतीसाठी पाठवले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते पुणे महापालिका मुख्य इमारत येथे सदर पथकाला फ्लॅग ऑफ देण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील उपायुक्त अजित देशमुख, तसेच आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांकडील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कार्यरत असलेले सफाई सेवक व मुख्य विभागाकडील काही पर्यवेक्षकीय कर्मचारी, ३० जुलैपासून ते ७ ऑगस्टपर्यंत कोल्हापूर येथील संबंधित गावांमध्ये स्वच्छतेचे कामकाज करणार आहे. या सर्वांसोबत मोटार वाहन विभागामार्फत एक युटीलिटी व्हॅनही पाठविण्यात आली असून, या सर्व सेवकांना कामकाजाकरिता आवश्यक साहित्य व सुरक्षा प्रावरणे देण्यात आलेली आहेत.
--------------------------
फोटो