नगरसेवकांचा आलिशान थाट
By Admin | Published: July 29, 2016 03:55 AM2016-07-29T03:55:38+5:302016-07-29T03:55:38+5:30
शहरातील नागरी, मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन निवडून आले, महत्त्वाच्या पदावर विराजमान झाले. नगरसेवक म्हणून मिरवत असताना, हातात महागडे मोबाइल दिसू लागले.
- नवनाथ शिंदे, पिंपरी
शहरातील नागरी, मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन निवडून आले, महत्त्वाच्या पदावर विराजमान झाले. नगरसेवक म्हणून मिरवत असताना, हातात महागडे मोबाइल दिसू लागले. दिमतीला आलिशान मोटारी दाखल झाल्या. थाट वाढला; आश्वासनांचा मात्र त्यांना विसर पडला आहे़ त्यांच्या वागण्या-बोलण्यात झालेला बदल नागरिकांना सहज जाणवू लागला असून, मतदार म्हणून त्यांना आता पश्चात्तापाची वेळ आली आहे.
उद्योगनगरीच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मतदारांनी नगरसेवकांना निवडून दिले़
नागरी विकासापेक्षा स्वत:च्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या
काही नगरसेवकांना जनतेचा विसर पडला आहे़ अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे़ महापालिकेच्या आवारात नवनव्या आलिशान मोटारी सामान्य नागरिकांचे डोळे दिपवत आहेत. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेवली आहे. त्यामुळे नगरसेवकांची चमकोगिरी वाढू लागली आहे़ (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांऐवजी अंगरक्षक
काही वर्षांपूर्वी कार्यकर्ता म्हणून दुचाकीवर वॉर्डात फिरणारे नगरसेवक आता काळ्या काचेच्या मोटारीतून वार्डात फेरफटका मारताना दिसून येतात. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात नगरसेवकांची आलिशान गाडी थांबवली जाते़ पांढरे खादीचे कपडे, हातात महागडा मोबाइल, उच्च प्रतीचे मनगटी घड्याळ, गळ्यात सोन्याची साखळी, बोटांत अंगठ्या़,असा पेहराव अनेक नगरसेवकांचा आहे़ गाडीतून खाली उतरताच अंगरक्षक त्यांना गराडा घालतात़
थेट संवादाऐवजी सोशल मीडिया
कामानिमित्त महापालिकेच्या आवारात आलेले नागरिक वॉर्डाचा नगरसेवक
म्हणून भेटण्यासाठी पुढे जातात. परंतु थोडा वेळ थांबून त्यांच्याशी बोलण्यासाठी नगरसेवकांना
वेळ नसतो. मोबाइलच्या स्क्रीनवर बोटे
फिरवण्यात मग्न असल्यामुळे जनतेसोबत
त्यांचा प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. त्यांचा जनसंपर्क कमी होत चालला आहे़ एका नगरसेवकांकडे दोनपेक्षा अधिक मोटारगाड्या असल्याचे नागरिक सांगतात.
आलिशान मोटारींचे फॅड
मर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, आॅडी, फॉर्च्युनर, टोयाटो लॅक्सेस, इनोवा, मान्झा, स्कॉर्पिओ अशा महागड्या एकासरस एक गाड्या वापरणारे नगरसेवक पिंपरी-च्ािंचवडमध्ये आहेत. अक्षरओळख नसलेल्या अनेक नगरसेवकांच्या हातात महागडे स्मार्ट फोन आहेत. केवळ वाहन बदलून नाही, तर एकूणच त्यांची जीवनशैली बदलली आहे.