महापालिकेच्या डॉक्टरांनी फक्त आरोग्य विभागाचेच काम  करावे : आयुक्तांचे स्पष्ट आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:45 PM2019-10-18T12:45:59+5:302019-10-18T12:48:45+5:30

घनकचरा विभागात काम करावे लागणार नाही

Municipal doctors should work only in health department: clear order of commissioners | महापालिकेच्या डॉक्टरांनी फक्त आरोग्य विभागाचेच काम  करावे : आयुक्तांचे स्पष्ट आदेश 

महापालिकेच्या डॉक्टरांनी फक्त आरोग्य विभागाचेच काम  करावे : आयुक्तांचे स्पष्ट आदेश 

Next
ठळक मुद्दे वैद्यकीय अधिकाºयांच्या कामात नेमकेपणा येणार पाच परिमंडळांचे वैद्यकीय अधिकारी ही पदे मंजूर नाहीत

पुणे : महापालिकेच्या परिमंडल आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काम करणाऱ्या डॉक्टरांनी फक्त आरोग्य विभागाचेच काम करावे, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील प्रभारी सहायक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यभार व कामकाजाबाबत आदेश निर्गमित केले आहेत. यापुढे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे काम करावे लागणार नसल्याचे या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. 
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग व आरोग्य विभागामार्फत शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत कामे चालतात. आरोग्य विभागाकडून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा व इतर आरोग्य विषयक सेवा पुरविण्याचे काम या विभागाकडून केले जाते. तसेच शहरात दैनंदिन गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत केले जाते. महापालिकेचा वाढता विस्तार, शहराचे विस्तारत चाललेले क्षेत्रफळ व वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विषयक कामे अधिक कार्यक्षमतेने व तत्परतेने होणे आवश्यक असल्याने आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. 
सहायक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामामध्ये काही बदल केले आहेत. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे शालेय आरोग्य, शहर क्षयरोग अधिकारीपदाची जबाबदारी, राष्ट्रीय लसीकरण, राष्ट्रीय कार्यक्रम (क्षय, एड्स, व्हेक्टर, बॉर्न जिसिजेस, कुष्ठरोग, अंधत्व, निवारण) यासह परिमंडल चारच्या सनियंत्रण व पर्यवेक्षणाची जबाबदारी आहे. त्यामध्ये एनयूएचएम, आरसीएच प्रकल्पाचीही जबाबदारी वाढविली आहे. तर, डॉ. मनीषा नाईक यांच्याकडे  नर्सिंग होम रजिस्टेÑशन, विकेंद्रित परवाना विभाग, परिमंडल दोनचे पर्यवेक्षण आणि सनियंत्रणाच्या जबाबदारी व घनकचरा विभागाकडील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट विभाग दिला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचे नियंत्रण आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र देखणे यांच्याकडे राहणार आहे. प्रभारी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे दिले असून त्यांचे नियंत्रण अधिकारी  ज्ञानेश्वर मोळक असणार आहेत. 
..........
नवनवीन आजार उद्भवत आहेत. त्यामुळे या आरोग्य अधिकाऱ्यांना पूर्णपणे आरोग्य विभागाचेच काम देण्याची मागणी होत होती. 
महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ आरोग्य विभागाचे काम करावे, असे नमूद केल्याने वैद्यकीय अधिकाºयांच्या कामात नेमकेपणा येणार आहे. 
........
पाच परिमंडळांचे वैद्यकीय अधिकारी ही पदे मंजूर नाहीत
यासोबतच परिमंडळ कार्यालयांकडे उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ आरोग्य विभागाचेच कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे. महापालिकेच्या पाच परिमंडलांना पाच वैद्यकीय अधिकारी नेमलेले आहेत. ही पदे मंजुरीप्राप्त नाहीत. तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर १५ वैद्यकीय अधिकारी नेमलेले आहेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वच्छता, कचरा पेट्या, स्वच्छ भारत अभियान यासह घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत येणारी सर्व कामे करावी लागत होती. शहरात आरोग्य विषयक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. 

Web Title: Municipal doctors should work only in health department: clear order of commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.