महापालिका शिक्षण विभाग; ११०४ पदांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:09 AM2021-07-09T04:09:16+5:302021-07-09T04:09:16+5:30

पुणे: महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या कर्मचारी आकृतिबंधास राज्य सरकारने मान्यता दिली. तसा निर्णय उपसचिव स. ज. मोघे यांच्या स्वाक्षरीने ...

Municipal Education Department; Recognition of 1104 posts | महापालिका शिक्षण विभाग; ११०४ पदांना मान्यता

महापालिका शिक्षण विभाग; ११०४ पदांना मान्यता

Next

पुणे: महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या कर्मचारी आकृतिबंधास राज्य सरकारने मान्यता दिली. तसा निर्णय उपसचिव स. ज. मोघे यांच्या स्वाक्षरीने महापालिका प्रशासनास कळवण्यात आला आहे.

ही सर्व पदे प्रशासकीय आहेत. महापालिकेच्या वतीने सरकारला याबाबत काही वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याचा वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय घेतला जात नव्हता. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी मुंबईत महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांविषयी बैठक घेतली होती. त्यात या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर लगेचच सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. राज्यपालांच्या मंजुरीने तो महापालिकेला कळवण्यात आला.

पदभरती करताना महापालिकेला सर्व सरकारी नियमांचे पालन करावे लागेल. प्रशासकीय खर्च एकूण खर्चाच्या ३५ टक्केपेक्षा जास्त होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. सर्व पदांची वेतनश्रेणी त्या पदांच्या सरकारी वेतनश्रेणीशिवाय जास्त असणार नाही, असेही महापालिकेला कळवण्यात आले आहे.

Web Title: Municipal Education Department; Recognition of 1104 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.